३० गुंठे टोमॅटो १२०० क्रेट दर १७० ते २०० रू. क्रेट - २ लाख ३५ हजार

एक शेतकरी


अभिनव टोमॅटो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ३० गुंठ्यामध्ये लावले आहे. मोसंबीनंतर टोमॅटोलादेखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले. पहिल्यांदा वावर (रान) नांगरून घेतले. नंतर शेणखत १ ट्रोली आणि २ बॅग कल्पतरू टाकले आणि १० ते १२ दिवसांनी २ फूट रुंदीची सरी काढली रोपे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून १॥' - १॥' अंतरावर लावली. जर्मिनेटरच्या प्रक्रियेमुळे एकाही रोपाची मर झाली नाही. शेंडा वाढ चांगली झाली. नागअळी कुठेही दिसली नाही. झाडांची वाढ चांगल्याप्रकारे होऊ लागली.

नंतर १० ते १५ दिवसांचा प्लॉट असताना जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३० मिलीची १० लि. पाण्यातून पहिली फवारणी केली. या फवारणीमुळे चांगल्याप्रकारची फुट होऊन कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव न होता वाढ जोमाने सुरू झाली.

नंतर ३० ते ३५ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, न्युट्राटोन,प्रोटेक्टंट यासोबत १९: १९: १९ अशी एकत्र दुसरी फवारणी केली. त्यामुळे झाडाची फांद्या, शेंडा वाढ झाली. झाडे वाढली. मावा, तुडतुडे व्हायरस नव्हता.

नंतर ४५ दिवसांनी तिसरी फवारणी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, न्युट्राटोनची केली. ही फवारणी करत असताना फुले व लहान फळे लागली होती. तर या फवारणीमुळे फळांचे पोषण झाले. फुलेदेखील भरपूर लागली. फळांवर डाग नव्हते. फळे एकसारखी दिसू लागली. नंतर ६० दिवसांनी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, न्युट्राटोन, ०:५२:३४ ची चौथी फवारणी केली. तर मला ३० गुंठ्यातून ६०० ते ७०० क्रेटचे उत्पादनाची अपेक्षा असताना डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने १२०० क्रेट उत्पादन मिळाले असून २०० ते २५० क्रेट टोमॅटो माल मागे शिल्लक आहे. अशा पद्धतीने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कमी खर्चात जवळपास दुप्पट उत्पादन मिळाले.

सर्व मालास १७० ते २०० रू. / क्रेट भाव मिळाला. दररोज ६० ते ७० क्रेट टोमॅटो निघत होता. अशाप्रकारे माझा एकूण खर्च १७ ते १८ हजार रू. झाला व उत्पन्न २ लाख ३५ हजार रू. मिळाले.