सांगीन चार गोष्टी युक्तीच्या - भुईमूग, कांदा बिजोत्पादन प्लॉट यशस्वी !

श्री. मुरलीधर श्रीराम सुरडकर,
मु. पो. नायगाव देशमुख, ता. मेहकर, जि. बुलढाणा.
मोबा. ९८८१३१४०९०१५ फेब्रुवारी २०१३ ला भुईमूग एसबी - ११ व टीएजी - २४ ची १० एकरमध्ये लागवड केली आहे. जमीन लालसर ५ एकर आणि काळ्या मातीची ५ एकर आहे. हे पीक १ वर्षाच्या भगवा डाळींब पिकामध्ये आंतरपीक म्हणून केले आहे.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कृषी विज्ञान मासिक प्रदर्शनामधून चालू केले आहे. त्यामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी जालना प्रतिनिधी श्री. खरात यांचा मोबा. नंबर मिळाल्यावर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घरी येऊन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची संपूर्ण माहिती दिली. प्रथम रान नांगरून रोटाव्हेटरने जमीन भुसभुशीत करून घेतली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे कल्पतरू सेंद्रिय खत एकरी १ बेग आणि शेणखत एकरी २ ट्रोली टाकले. नंतर बियाणे आणल्यावर जर्मिनेटरचे द्रावण बीजप्रक्रियेस शिंपडून वापरले. . त्यामुळे बुजापाक्रिया केलेले बियाणे शेतात लावले (ट्रॅक्टरने ५ एकर पेरला व ५ एकर टोकला) असता एकदम चांगल्याप्रकारे १०० % उगवण झाली. कुठेही मर नाही. मुळकूज नाही. कोंब एकदम चांगल्या वर आला. दरवर्षी १० ते २०% मर होते. बियाणे जमिनीतच सडते असे अनुभव येतात.

१० -१५ दिवसानंतर १ कल्पतरू बॅग आणि १५: १५: १५ ची १ बॅग मिक्स करून टाकले. तर २ दिवसात भुईमूगाची वाढ झपाट्याने होऊ लागल्याचे जाणवू लागले. कुठेही पिवळेपणा नाही. खताचा चांगल्याप्रकारे रिझल्ट मिळाला. ज्याप्रमाणे त्यांनी सांगितले तसाच रिझल्ट मिळाला.

पहिली फवारणी खत दिल्याच्या दुसर्‍या दिवशी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, हार्मोनीची केली, दुसरी फवारणी उगवणीनंतर २५ ते ३० दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, प्रोटेक्टंट, न्युट्राटोन, प्रिझमची केली.४० ते ४५ दिवसांनी तिसरी फवारणी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन, प्रोटेक्टंटची केली. ६० दिवसांचा प्लॉट असताना थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोनची चौथी फवारणी केली.

सध्या ७० दिवसांच्या प्लॉट असून शेंगा खूप लागल्या आहेत. शेंगा जाड व लांब पोसली असून दरवर्षीपेक्षा दाणे वजनदार भरले आहेत. तरी एकरी ३५ ते ४० पोती ओल्या शेंगा सहज होतील. मागील वर्षी २५ पोती उत्पन्न मिळाले होते.

>डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पात हिरवीगार

आम्ही भुईमूगासाठी वापरलेली डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी बियाच्या कांद्यासाठीही वापरली. कांद्याचे बियाणे (गोट) जर्मिनेटरची प्रक्रिया करून लावले तर उगवण अतिशय चांगली झाल. ज्यावेळीस कांदा १५ दिवसांचा होता तेव्हा जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ४० मिलीची १० लि. पाण्यातून पहिली फवारणी केली. तर कांदा पात एकदम हिरवीगार लुसलुसीत दिसत होती. कुठेही पात पिवळी पडत नव्हती.

त्यानंतर २५ ते ३० दिवसांना कांदा प्लॉट असताना थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट या चारी औषधांची दुसरी फवारणी केली. फवारणीपुर्वी प्रोटेक्टंट पावडर २ तास पाण्यामध्ये भिजवून नंतर सुती कापडामधून गाळून घेऊन नंतर फवारणीसाठी वापरली तर दुसर्‍या फवारणीमुळे कांद्याची वाढ झाली, गोंडे फुटले.

कांदा बियापासून एक ते सव्वा लाख - एक आशा

त्यानंतर तिसरी फवारणी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन, प्रोटेक्टंटची केली तर मधमाश्यांचे प्रमाण वाढून चांगल्याप्रकारे गोंडा पोसला. गोंड्यामध्ये वजनदार टणक बी भरले, त्यामुळे एक एकरातून ४ ते ५ क्विंटल कांदा बियाणे उत्पादन होईल. अशी प्लॉट परिस्थिती आहे. (संदर्भ :कव्हरवरील फोटो) आमध्य भागात कांदा बियास २५००० रू./ क्विंटल भाव मिळतो. त्यानुसार एकरातून १ - १। लाख रू. सहज होतील.

एरवी ३ ते ३॥ क्विंटल कांदा बिजोत्पादन होते. मात्र या वर्षीसारखा अनुभव या पुर्वी कधीही मिळाला नव्हता. ते केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळेच साध्य झाले.