डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे वापराने कलिंगड (टरबूज) यशस्वी !

डॉ. सुधीर जयवंत आढाव,
मु. पो. यवती, ता. श्रीगोंदा, जि . अहमदनगर.
मोबा . ९२२१८५५२८७मी कृषी विज्ञान मासिकात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती वाचली. त्यामधील शेतकऱ्यांचे अनुभव वाचले. त्यावरून मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येठीली श्री. दिलीप अरगडे यांना फोन करून सर्व माहिती घेतली.

माझे शिक्षक बी. एच. एम. एस. झाले आहे. तरीसुद्धा मला शेतीची आवड आहे. माझी जमीन मध्यम स्वरूपाची आहे. मला शेतीमधील पुर्ण माहिती नव्हती. मी फक्त ज्वारीचे पीक घेत होतो. परंतु ह्या जमिनीमध्ये कलिंगड लावायचे ठरविले. मी दिलीप अरगडे ह्यांना फोन केला असता त्यांनी मला कल्पतरू सेंद्रिय खत आवर्जुन लावायला (वापरायला) सांगितले. मी पवळे एजन्सीज, कवठे यमाई येथून ७ बॅग कल्पतरू आणले. बेडमध्ये टाकल्यानंतर ५ ते ६ दिवसांनी जर्मिनेटर चे ड्रेंचिंग केले. ८ दिवसात वेलींची वाढ होऊन पाने टवटवीत झाली. पांढरी मुळी वाढली. त्यानंतर मला त्यांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रिझम, २०० लि. पाण्यासाठी प्रत्येकी १ लि. फवारायला सांगितले. तर काय किमया ! ८ ते १० दिवसामध्ये वेल एकदम वाढून पुर्ण बेड झाकून गेला. फुलधारणा होऊन भरपूर प्रमाणात फळे लागली. प्लॉट पाहून येणारे जाणारे लोक थांबून प्लॉट पाहून अचंबित होतात. महत्त्वाचे म्हणजे दुपारी कडक उन्हात सुद्धा प्लॉट टवटवीत दिसतो. दुसरे म्हणजे आमच्या आजुबाजुला बरेच कलिंगडचे प्लॉट आहेत. परंतु ते पिवळे पडून सुकून गेलेत. माझा मात्र प्लॉट एकदम टवटवीत आहे आणि फलधारणा सुद्धा भरपूर प्रमाणात असून फळांची फुगवण चांगली आहे. ही सर्व कल्पतरू सेंद्रिय खताची तसेच सप्तामृत औषधांची किमया आहे. कल्पतरूमुळे जमिनीत गारवा राहून पांढऱ्या मुळ्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या प्रतिनिधींनी ८/ ०४/ २०१३ रोजी प्लॉटला भेट दिली. त्यांनी थ्राईवर, क्रॉंपशाईनर,न्युट्राटोन फवारायला सांगितले. पुढे मी डाळींब पण त्यांच्याच सल्ल्याने लावणार आहे.