मोसंबीची ४०० झाडे, १५ टन उत्पादन २ लाख २५ हजार

श्री. प्रेमसिंग भाऊलाल देवणे,
मु. पो. चांडोळ, ता. जि. बुलढाणा,
मोबा. ९९२३५४३८५२


माझ्याकडे ४ वर्षापुर्वी १८' x १८' वर लागवड केलेली सोमंबीची ४०० झाडे आहेत. जमीन काळी आहे. पाणी भरपूर असून पाटाने देतो.

यावर्षी मी जेव्हा सुनिल कृषी सेवा केंद्र, दानापूर यांच्याकडे गेलो, तेव्हा मी त्यांना म्हणाले, मोसंबीची चांगल्या प्रकारची क्वालिटी मिळत नाही. त्यासाठी काय औषधे आहेत का ? तेव्हा त्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे श्री. खरात यांचा मोबाईल नंबर दिला. त्यांना मी फोन केल्यावर खरात यांनी स्वत: शेतावर येऊन मोसंबीच्या प्लॉटची पाहणी केली असता फळे खराब दिसत होती. तेव्हा त्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन दिली. याची फवारणी केल्यावर ४ थ्या दिवशी फळे एकदम चमकदार क्वालिटीची दिसू लागली. १० दिवसात फळे मोठी दिसू लागली. चमक चांगली आली, खायला गोड आमच्या मनासारखी फळे मिळाली. जेव्हा मोसंबी जालना मार्केटला नेली. तेव्हा सर्वापेक्षा भाव जादा मिळाला. १५ हजार रू/ टन भाव मिळाला. ४०० झाडांपासून १५ टन मोसंबी निघाली. मोसंबीचा आंबे बहार धरला होता. ह्या मोसंबीचे १५ मार्च २०१३ ला तोडे संपले. या मोसंबीपासून २ लाख २५ हजार रू. उत्पनन मिळाले.