निवृत्तीनंतर आदर्श शेतकऱ्याचे स्वप्न डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने साकार

श्री. नामदेव तुकाराम शिंदे,
(सेवानिवृत्त फौजदार पोलिस), मु. पो. सोनोरी, ता. पुरंदर, जि. पुणे.
मोबा. ९६०४५४६५९१


आम्ही २०१० मध्ये अंजिराची लागवड १५ x १५ फुटावर केली आहे. ४ वर्षापासून बहार धरीत आहे. परंतु यंदाच सुरूवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर सुरू केला आहे.

सुरूवातीला पहिल्या पाण्याच्या वेळी जर्मिनेटर हे औषध पाण्यामधून दिले. तसेच हायड्रोजन सायनामाईड या विषारी द्रव्याचा वापर न करता प्रिझम, थ्राईवर, क्रॉपशाईनर यांची फवारणी केली. त्याचा परिणाम होऊन बाग लवकर फुटली व फळधारणा चांगली झाली.

तांबेरा रोग व रसशोषक किडी यांच्या व्यवस्थापनासाठी बुरशीनाशक व किटकनाशके फवारणी करीत असताना त्यामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी थ्राईवर, न्युट्राटोन, प्रोटेक्टंट - पी ही औषधे योग्य त्या प्रमाणात फवारली. तसेच माल फुगण्यासाठी, रंग व दर्जा सुधारावा म्हणून राईपनर, क्रॉंपशाईनर, न्युट्राटोन यांची फवारणी केली.

या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे दरवर्षीपेक्षा फळांची साईज व रंग दर्जा यामध्ये अनुकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रतिकिलो १० ते १५ रू. इतर शेतकऱ्यांपेक्षा जास्त दर मिळत आहे. रोगट मालाचे प्रमाणही अत्यल्प आहे. प्रतवारीमध्ये एक नंबर फळे जास्त आहेत. दर वर्षीपेक्षा २०% उत्पादनात वाढ होऊन बाजारभाव बाकीच्या शेतकऱ्यांपेक्ष जास्त मिळत असल्यामुळे माझ्या उत्पन्नात ५०% वाढ झाली आहे. सर्व माल पुणे येथे श्री. शिवलाल भोसले यांच्या गाळ्यवर विकला जातो. या अंजिराच्या व्यवस्थापनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतीनिधी श्री. ज्ञानेश्वर आदमाने, मोबा. ७७०९४०७३२१ आणि श्रीनाथ कृषी सेवा केंद्र, सासवडचे श्री. बाळासो अत्रे (मोबा. ९६०४८५६१५९) यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. पोलिस फौजदार म्हणून निवृत्त झाल्यानंतर एक चांगला शेतकरी होण्याचे माझे स्वप्न यामुळे साकार झाले आहे. या उत्साही सुरूवातीमुळे ११० अंजीर झाडापासून सुरुवात करून आता पुन्हा २५० अंजीर झाडे व ३०० सिताफळ झाडे लावली आहेत. या झाडांनाही कल्पतरू व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा सुरूवातीपासून वापर करत असल्यामुळे अत्यंत बहारदार फुटवे दिसत आहेत.

गारपिटीने इतर शेतकऱ्यांचे अंजिराचे नुकसान ५०% माझे मात्र १०%

आता एक एकर टोमॅटो उन्हाळी लागवड करणार असून त्यासाठी देखील डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरण्याचे ठरवले आहे. कारण मध्यंतरी गारपीट, पाऊस व खराब हवामान यामुळे इतर शेतकऱ्यांचे अंजिराचे ५०% पर्यंत नुकसान झाले असताना माझे १०% पेक्षा कमी नुकसान झाले आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे कऱ्हा अॅग्रो हायटेक/श्रीनाथ कृषी सेवा केंद्र श्री. अत्रे यांच्या सल्ल्यानुसार वापरल्यामुळे फायदा होत आहे.