३० गुंठ्यात द्राक्षाचे सव्वा चार लाख

श्री. ईसाकभाई ईनामदार,
मु.पो. वडनेर भैरव, ता. चांदवड, जि. नाशिक.
मो. ९०११८१७५५७


शरद वाणाची द्राक्षबाग १०' x ५' वर लावलेली आहे. तसेच सोनाका, थॉमसन वाणाचीहि द्राक्ष आहे. पण मी शरद वाणाच्या ३० गुंठे क्षेत्रासाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा चालू वर्षी कंपनी प्रतिनिधी श्री. ईश्वर शिंदे व पिंपळगाव (ब.) येथील बी. अे. अॅग्रो एजन्सीज यांच्या मार्गदर्शनानुसार वापर केला.

सुरुवातीला जर्मिनेटरचा पेस्टमध्ये वापर केला. परिणामी फुट जोमदार एकसारखी मिळाली. नंतर घड जिरू नये म्हणून थ्राईवर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. च्या फवारणीमुळे घड टपोरे झाले व जिरले नाही. त्यानंतर ८ ते १० दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी १ लि. ची. २०० लि. पाण्यातून फवारणी केली. शडा जोमदार वाढला. पाने रुंद, रफ होऊन रोगप्रतिकार क्षमता वाढली, तसेच काही किटकनाशक, बुरशीनाशक आणि सी. पी. पी.यु. चा वापर केला. फुगवणीसाठी, कलर, गोडी एकसारखी येण्यासाठी क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन, हार्मोनीच्या पाणी उतरल्यापासून ४ फवारण्या केल्या, परिणामी गोडी मिळाली व कलर काळा एकसारखा येवून फुगवण जबरदस्त झाली. आमच्या भागात भुरी व डावणी रोगाने भरपूर थैमान घातले होते. पण मी हार्मोनी औषधाचा योग्य वापर केल्याने भुरी दिसलीच नाही. डावणी देखील पहिल्याच अवस्थेत आटोक्यात आला. मी सराव सप्तामृत औषधे प्रत्येकी १० - १० लि. चा वापर केला. ३० गुंठ्यातून शरदचा ८४ क्विटंल माल मिळाला, त्याला ५१ रू. दर मिळाला, तो खास करून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे. मी 'हार्मोनी', मुळे अतिशय प्रभावित झालो. भुरी व डावणी रोग नियंत्रणासाठी हे योग्य औषध आहे. या तंत्रज्ञानाने मला ३० गुंठ्यात सव्वा चार लाख रू. उत्पन्न मिळाले.