कांदा, स्वीटकॉर्न, मेथी पिकातून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने समृद्धीचा मार्ग !

श्री. घोंडीभाऊ विष्णूजी नाईकरे,
दत्तनिवास, कमान (चास), ता. खेड, जि. पुणे,
मोबा. ९४२०१६१२७७नोव्हेंबर २०१३ मध्ये दीड एकर गरवा कांदा आर्धोलीने वाटेकऱ्याला दिला व आम्ही घरी १५ गुंठे स्वत: केला. वाटेकऱ्याने या कांद्याला आपले तंत्रज्ञान वापरले नाही. त्यामुळे उत्पादन कमी निघाले, शिवाय काढणीनंतर लगेच नासू लागला. त्यामुळे लगेच विकावा लागला. पत्तीला कलर नसल्यने भाव कमी ९०० रू./क्विन. मिळाला.

आम्ही मात्र नेहमीप्रमाणे स्वत: केलेल्या (१५ गुंठे) कांद्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे ४ फवारे केले. सुरुवातीला रोपे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून लावली होती. यावर्षी हवामान खूपच खराब होते. त्यामुळे त्या भागात कांद्याच्या उत्पादनात सर्वत्र घट आली असताना आम्हाला १५ गुंठ्यातून ४० पिशवी एकसारखा, गोल्टी, डबल पत्तीचा, वजनदार कांदा मिळाला. विशेष म्हणजे कांद्याचा टिकाऊपणा चांगला आहे. कोठेही सड (नासका) कांदा दिसत नाही. सध्या भाव कमी असल्याने तो साठवला आहे.

गेल्यावर्षी याच १५ गुंठ्यात कांदा होता तर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ४ फवारण्यांमुळे आणि हवामानही अनुकूल लाभल्याने १०० पिशवी कांदा उत्पादन मिळाले होते. कांदा काढल्याबरोबर १४०० रू./क्विंटल ने विकला होता. त्यातील काही निवडून बियाण्यासाठी (गोट कांदा) ठेवला होता. तर घरचे भागून उरलेला गोट कांदा ६० रू. किलोने शेतकऱ्यांनी बी तयार करण्यासाठी नेला.

हे घरचे ४ पायल्या बी सप्टेंबर २०१३ मध्ये २० गुंठ्यात जर्मिनेटरची बीजपक्रिया करून टाकले होते. तर त्यापासून घरची २ एकर लागवड होऊन उरलेल रोप विकले. त्याचे २० हजार रू. झाले. २० गुंठ्यातील रोप निघाल्यानंतर त्याच रानात मशागत करून सारे पडून मेथी टाकली आणि त्या साऱ्यामध्येच १ - १ फुटावर स्वीटकॉर्न शुगर - ७५ चे १।। किलो बी टोकले.

स्वीटकॉर्नमधील मेथी २५ दिवसात १५ हजार

मेथीला जर्मिनेटची बीजपक्रिया केल्यामुळे उगवण सर्वच्यासर्व होऊन पुढे ८ - ८ दिवसांनी ३ वेळा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनरच्या फवारण्या केल्या. तेवढ्यावर मेथी २५ दिवसात काढणीस आली. सुरुवातीला बाजारभाव कमी होते. २०० ते ३०० रू./ शेकडा भावाने १५०० गड्ड्या विकल्या, शेवटच्या २००० गड्ड्या ७०० रू./शेकडा भावाने गेल्याने त्याचे १४ हजार झाले, असे २० गुंठ्यातील मेथीचे २५ दिवसात खर्च वजा जाता १५ हजार रू. झाले आणि त्यातील आंतरपीक स्वीटकॉर्नलादेखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे ३ फवारे १५ दिवसाला केल्यामुळे ७० दिवसात स्वीटकॉर्न निघाला. पुणे मार्केटमध्ये घुले व्यापारी यांचेकडे अगोदर चौकशी केली होती. तर त्यांनी मंगळवारी माल आणण्यास सांगितले. कारण सोमवारी गुढीपडावा असल्याने मजुर मिळत नाहीत. त्यामुळे मार्केटला माल कमी येईल व वाढीव भाव सापडतील. म्हणून मी मजूरी १०० रू. ऐवजी १५० रू. देऊन स्वीटकॉर्नची ५१ पोती (५० किलोची) माल काढला. १ पोते स्वीटकॉर्न वानोळा म्हणून घरी व शेजारी, नातेवाईकांना वाटला आणि ५० पोती आज मंगळवार दिनांक १ एप्रिल २०१४ रोजी पुणे मार्केटला आणला.

२० गुंठे स्वीटकॉर्न ३५ हजार

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्याने आपल्या कणसांचा पाला हिरवागार होता. त्यामुळे २ ते ३ रू. किलोने जाणारा स्वीटकॉर्न आज गुढीपाडाव्याच्या दुसऱ्या दिवशी ९ रू. किलोने गेला. यातील ४० कट्टे हातोहात वडकी नाल्याच्या (हवेली, जि. पुणे) एकाने नेली. ते दाणे सोलून एक्स्पोर्ट करतात. बाकीची १० पोती दुसऱ्या व्यापार्याने घेतली. पट्टी ज्या त्या दिवशी लगेच होते. आजची पट्टी २१ हजार रू. ची झाली असून अजून २० पोती कणसे निघतील. त्याचे कमीत - कमी ५ हजार रू. तर सहज होतील. शिवाय कणसे काढल्यानंतर चाऱ्यासाठी ४० वाफ्यातील मका (चारा) २५० रू./वाफा प्रमाणे विकला गेला, त्याचे १० हजार रू. झाले. असे २० गुंठ्यात स्वीटकॉर्नचे ३६ हजार रू. तर आंतरपीक मेथीचे १५ हजार झाले.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने उत्पादीत केलेल्या या स्वीटकॉर्न मक्याची घरच्यासाठी ठेवलेली कणसे सोलली असता दाणा ठळक, ढोबळ, उंच, टोकापर्यंत एकसारखा टच्च भरलेला होता. हे कणीस भाजताना काळा डाग पडेपर्यंत भाजण्याची गरज नसते. थोडे भाजले आणी दोन मिनीट कोमट होईपर्यंत ठेवून दाणे सोलले असता सहज, सुभल, अखंड, दशी न येत निघतो. चवीला दाणा गोड, मुलायम होता. नाष्ट्यासाठी असे स्वीटकॉर्न अतिशय पौष्टिक असते. बऱ्याच हॉटेल्समध्ये स्वीटकॉर्न च्या दाण्यात साध्या मक्याचे दाणे मिसळले जातात. त्यामुळे हे कमी चविचे सूप असून देखील त्याची ३० रू. पासून ७० - ८० किंमत असते. यापेक्षा घरगुती एका कणसाच्या दाण्यापासून १५ मोठे कप उत्कृष्ट सूप तयार होत असून ते अतिशय चविष्ट, पौष्टिक, आरोग्यवर्धक, मुलद्रव्ययुक्त, संवर्धक आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या मुलांना प्रशिक्षण देवून जर त्यांना उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या अथवा नाताळाच्या सुट्टीत अशा स्वीटकॉर्नपासून दाणे काढून बंद पाकिट पॅकिंग केले असता एका कणसाचे ४० - ५० होतील आणि त्याचेच सूप तयार केले असता एका कणसापासून ४०० ते ५०० रू. चे सूप तयार होते. वेगवेगळ्या पर्यटन स्थळी, एस. टी. स्टेन्ड, यात्रा, बाजारात असे मुल्यवर्धीत पदार्थ विकले असता अधिक उत्पन्न मिळेल.