अवकाळी पावसातही जंबोरीची पन्हेरी सुद्दढ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा फायदा

श्री. अरुणराव सितारामजी डोईजोड,
मु.पो. मलकापूर, ता. वरूड, जि. अमरावती - ४४४९०७.
मोबा.९७६४१९६०५३


आम्ही दरवर्षी संत्र्याची पन्हेरी करतो. प्रथम ५ ते ६ वर्षाच्या ईडलिंबाच्या झाडांवरील फळांपासून बी काढून ते नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात वाफ्यात टाकले जाते. त्याची ७० ते ७५ % पर्यंत उगवण होते. अशा रोपांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जर्मिनेटर, थ्राईवर, प्रिझम, क्रॉपशाईनर, फवारणी करतो. त्यामुळे रोपांची निरोगी वाढ होते. मध्ये गरजेनुसार खत व पाणी देत असतो. नंतर जुलैमध्ये जमीन तयार करून ही रोपे ८ x ८ इंचावर चऱ्या पाडून चौफुलीवर रोप बसेल असे खड्डे करून त्यात ही ईडलिंबूची रोपे लावतो. या रोपांची नोव्हेंबरपर्यंत पेन्सिलहून जाड, पेनच्या आकाराची काडी झाल्यावर साधारण ५ ते ७ वर्षाच्या नागपूरी संत्रा बागेतील डोळे काढून बानकरी (बडींग करतो. म्हणजे ईडलिंबाची साधारण १। ते १।। फुटाची रोपे असताना पेनच्या जाडीच्या आकाराच्या, जमिनीपासून ८ ते १० इंचावरील रोपाच्या भागावरील साल काढून डोळा भरून त्यावर पट्टी बांधतो. ही पट्टी २१ दिवसांनी सोडतो. याकाळात डोळा हिरवा होऊन बारीक फूट दिसू लागते. मग खुंट रोपाचा शेंडा (ज्या ठिकाणी डोळा भरला आहे त्याच्या वरील) कट करतो. त्यानंतर मग हा कलम केलेला डोळा जोमाने वाढीस लागतो. या रोपांना गरजेनुसार खत - पाणी देतो. अशी रोपे पुढील जुलै महिन्यात १।। ते २ फूट उंचीची लागवडीयोग्य तयार मिळतात. ही रोपे पाऊसकाळ चांगला झाल्यास रोपांना मागणी वाढली की १५ रू. पासून २५ रू. पर्यंत दराने विकली जातात. अशा पद्धतीने आम्ही मागील ३ वर्षापासून संत्र्याची पन्हेरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची उत्पादने वापरून करीत आहे.

रोपे तयार करताना मी सुरूवातीला अनुभवासाठी जर्मिनेटर व प्रिझमची ड्रेंचिंग व फवारणी केली. त्यामुळे माझ्या नर्सरीमध्ये असलेला पिवळसरपणा कमी झाला व पन्हेरीची नवतीसुद्धा साफ झाली. नवतीची चाल चालू राहिली. माझी बानकरी (बडींग) उशीरा होवून सुद्धा अगोदर केलेल्या पारंपारिक बडींगच्या रोपांच्या बरोबरीत आली. ह्या पहिल्या अनुभवानंतर मी सतत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची उत्पादने वापरत आहे.

यावर्षी जुलै २०१४ पर्यंत पाऊस न झाल्याने मला पन्हेरी नर्सरीची लागवड जुलैनंतर उशीरा करावी लागली त्यामुळे जंबोरीची वाढ उशीरापर्यंत झाली. लागवड उशीरा झाल्याने पुढे बानकरी (डोळे भरणे/बंडिग) सुद्धा उशीरा म्हणजे फेब्रुवारी महिन्यात झाली. त्यामध्ये मी जर्मिनेटर, प्रिझमची दर १५ दिवसांनी ड्रेंचिंग सुरू केली. त्यामुळे माझ्या नर्सरीमधील पन्हेरी ही मजबूत बनली आणि नवती सफ होवून तिने जोरात चाल पकडली. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सगळीकडे मुळकूज व इतर बुरशीजन्य रोग पसरले. परंतु मी जर्मिनेटर व प्रिझमचे ड्रेंचिंग केल्यामुळे माझ्या नर्सरीमध्ये त्या रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही. वातावरण खराब असल्यामुळे मी क्रॉपशाईनरचा वापर केला. त्यामुळे अवकाळी पाऊस व धुवारीचा माझ्या नर्सरीवर काहीही वाईट परिणाम झाला नाही.

या वर्षी गेल्या दोन महिन्यापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी ह्या भागामध्ये नर्सरीची पाहणी करत असून त्यांनी वेळोवेळा माझ्या पन्हेरी नर्सरीला भेट देवून मला योग्य ते मार्गदर्शन केले आहे व त्याचा मला पुरेपूर फायदा झाला आहे.