कापूस, मिरची, कोबी, हळद या पिकांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी अत्यंत उपयोगी !

श्री. नामदेवराव सोनबाजी कळंबे,
मु.पो. मलकापूर, ता.वरूड, जि.अमरावती.
मोबा. ९४२१७८७५९१


गेल्या २० वर्षापासून मी संत्र्याची पन्हेरी नर्सरी तयार करीत आहे आणि २ वर्षापुर्वी मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीबद्दल माहिती मिळाली. मी शेंदुरजनाघाट, ता. वरूड, जि. अमरावती येथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी प्रॉडक्टची मागणी केली मात्र तेथे वेळेत पुरवठा होत नसल्याने तेवढ्यासाठी शें.घाट फर्टिलायझर्सवर अवलंबून रहावे लागत होत. म्हणून मी डायरेक्ट नागपूरला चौकशी केली आणि फवारणी औषधे मागवून घेतली. त्यांची फवारणी प्रथम माझ्याकडील २ एकर वांगी पिकावर केली असता वांग्याची वाढ जोमाने होऊन क्वालिटी एकदम बदलली. तेव्हापासून मी संत्र्याच्या पन्हेरीवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे स्प्रे नियमित करीत आहे. त्याचा माझ्या पन्हेरीला खूप चांगला फायदा झाला. मला बाहेरच्या रसायनाचा वापर कमी करावा लागला.

फेब्रुवारी व मार्च महिन्यात सतत झालेल्या अवकाळी पावसामुळे संत्र्याच्या पन्हेरीमध्ये मुळकूज रोगाचे प्रमाण वाढले होते. पण मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या स्प्रेमुले आणि ड्रेंचिंगसाठी जर्मिनेटर, प्रिझम व बाहेरचे रेडोमिल वापरात आहे. त्यामुळे मुळकूज हा रोग माझ्याकडे इतरांपेक्षा खूपच कमी होता. तसेच कपाशी, मिरची कोबी आणि हळद या पिकांवर पण मी सुरूवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले असता माझ्या उत्पन्नात वाढ झाली. माझ्या अनुभवानुसार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची उत्पादने इतर कंपनीपेक्षा परवडणारी असल्यामुळे शिवाय खात्रीशीर रिझल्ट मिळत असल्याने त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो.