संत्रा व पन्हेरीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी उपकारक !

श्री. संकेतभाऊ दिवाकररावजी बगाडे,
मु.पो.शे. घाट, ता. वरूड , जि. अमरावती - ४४४९०७.
मोबा. ८६९८५२०१७१


मी गेली २ वर्षापासून ६० हजार पन्हेरीसाठी व ७५० संत्रा झाडांवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे ड्रेंचिंग व फवारणीसाठी जर्मिनेटर, प्रिझम व क्रॉपशाईनर वापरतो.

संत्रा झाडे १२ ते १४ वर्षाची आहेत व पन्हेरी जुलै २०१४ ला लावलेली आहेत. जमीन भारी प्रतिची असून संत्र्याची लागवड १७ x १७ फुटावर आहेत.

दोन्ही बाजुने डबल लाईनचे ठिबक केले आहे. पाणी भरपूर असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाटपाणी द्यायची सुद्धा सोय आहे. पूर्ण क्षेत्र विहीर बगायत आहे. मी या तंत्रज्ञानाने संत्र्याचा आंबे बहार तसेच मृग बहार सुद्धा घेतो.

माझ्या संत्रा व पन्हेरी झाडांची नवती व फूट वाढण्यासाठी मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर, प्रिझम, क्रॉपशाईनरची फवारणी केली. त्यामुळे संत्रा झाडांची फूट व नवती चांगली निघाली. त्यामुळे मला कुठलाही प्रॉब्लेम आला नाही. मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या विदर्भातील प्रतिनिधींना शेतात बोलावून सल्ला विचारत होतो आणि ते मला योग्य ते मार्गदर्शनही करत होते.

काही दिवसांनी मला पन्हेरीवर बुरशी आढळला तर मी हार्मोनी व जर्मिनेटरची दोन वेळा फवारणी केली. फवारणीनंतर ४ - ५ दिवसातच रोग नाहीसा झाला. त्यानंतर संत्रा झाडांच्या फळांची साईज व आकार वाढण्यासाठी मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या राईपनर, न्युट्राटोनची फवारणी केली. त्यानंतर झाडांची साईज व क्वालिटी चेंज झाली. १००% सुधारणा झाली.