संत्र्याची वाढ निरोगी आणी फळांचा साईज व दर्जात वाढ !

श्री. मोतीराम गोविंदराव चराते, मु.पो. रोशनखेडा, ता. वरूड, जि. अमरावती.


गेली ५ वर्षापासून आम्ही आमच्याकडे संत्रा ३०० व मोसंबी २०० झाडावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर व प्रिझमचा वापर करत आहे. आमच्याकडे १५ ते १६ वर्षाची ३०० संत्राची झाडे आहेत व १२ ते १३ वर्षाची २०० मिसंबीची झाडे आहेत. जमीन मध्यम प्रतिची असून संत्र्याची लागवड १६।।' x १६।।' आणि मोसंबीची लागवड १५' x १५' वर अशा पद्धतीची आहे. दोन्ही बागेला डबल लाईनचे ठिबक केले आहे व पाणी भरपूर असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये खतपाणी द्यायची सुद्धा पद्धत आहे. पुर्ण क्षेत्र विहीर बागायत आहे. आम्ही या तंत्रज्ञानाने संत्रा, मोसंबीचा आंबे बहार व मृग बहार घेतो.

संत्रा झाडांनी फूट व नवती काढण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर, प्रिझम व क्रॉपशाईनर ची फवारणी केली. त्यामुळे संत्र्याची फूट चांगली निघाली व झाडांची नवती पण खूप चांगली निघाली डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे खूप चांगले रिझल्ट आले आहेत. नंतर संत्रा झाडावर बुरशी सायट्रोसिला हा रोग आढळला. तेव्हा आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर, प्रिझम, रेडोमिल, अॅसेटॉंपची फवारणी केली. फवारणीनंतर ८ ते १० दिवसात खूप चांगले रिझल्ट मिळाले. रोग पुर्णता आटोक्यात आले.

संत्रा झाडांच्या फळांची साईज व आकार वाढण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे राईपनर व न्युट्राटोनची फवारणी केली, तर फळांची साईज वाढून क्वॉलिटी सुधारली.

मी माझ्या शेतात गेल्या ५ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरतो व मला खूप चांगले रिझल्ट मिळाले आहेत. त्यामुळे यापुढेही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीनेच शेती करणार आहे.