७० गुंठे कलिंगड ७४ दिवसात ३ लाख ५५ हजार रू. नफा

श्री. अरुण पांडूरंग पाटील,
मु.पो. सांगवी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद - ४१३६२३,
मो. ९८३३१३६०४०/९२२३२३६१५७



मी बऱ्याचा वर्षापासून शेती करीत आहे. परंतु माझे मुख्य पिक ऊस आणि कांदा हे होते. त्यामध्ये मी वर्षभर कष्ट करूनही म्हणावे तसे उत्पादन मिळत नव्हते. मग मी तरकारी पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी आम्हाला या पिकाबद्दलची कसलीच माहिती नसल्याने आम्ही चौकशी करू लागलो. त्यावेळी आमची भेट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. नागेश पाटील (मो.९६८९५०९९७६) यांच्याशी झाली. त्यांनी आम्हाला कलिंगड लागवडीचा सल्ला दिला आणि कलिंगड लागवडीचे पुर्ण नियोजन दिले. मग आम्ही शुगर क्विन जातीचे बी ७० गुंठ्यामध्ये जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून भारी काळ्या जमिनीत ६ x १। फुटावर २८ जानेवारी २०१६ ला लावले. प्रथम कलिंगड लागवडीसाठी मल्चिंग व ठिबक केले. मल्चिंग करण्यापूर्वी या ७० गुंठ्यासाठी ७ पोती कल्पतरू तसेच १० ट्रॉली शेणखत दिले.

जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केल्यामुळे उगवण लवकर व ९५ ते ९८% झाली. त्यानंतर नियमीत ५ ते ७ दिवसाच्या अंतराने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या करू लागतो. त्यामुळे वेलींची वाढ जोमाने झाली. फुलकळी चांगली लागली. वेलीवर ३ ते ५ फळे धरली होते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या नियमित फवारण्यांमुळे फळांचे पोषण अतिशय चांगल्याप्रकारे झाले. खराब हवामानामुळे या प्लॉटवर व्हायरसचा प्रादुर्भाव जाणवताच लगेच आपल्या फवारण्या ४ - ४ दिवसाला केल्या. त्याने व्हायरस आटोक्यात आला. पुढे नियमित ५ ते ७ दिवसाला याप्रमाणे कलिंगड काढणीपर्यंत एकूण १२ - १३ फवारण्या केल्या. ६१ व्या दिवशी (३० मार्च २०१६ ला ) कलिंगड काढणीस आले. फळांचे वजन ४.५ ते ५ किलोपर्यंत भरत होते. मोठा (३ ते ५ किलो वजनाचा) माल वाशी मार्केटला पाठविला. तेथे १० रू. पासून १३ रू./किलोपर्यंत भाव मिळाला. लहान फळे १.५ ते २ किलो वजनाची फार कमी निघाली, ती लातूर मार्केटला ६ रू. पासून १३ रू./किलो भावाने विकली. काही माल सोलापूर मार्केटला क्रेटवर विकला. क्रेट साधारण २५ किलो भरते. मोठ्या ७ - ८ फळांच्या क्रेटला ४०० रू. भाव मिळाला. लहान आकाराच्या फळांच्या क्रेटला २०० ते ३०० रू. असा भाव मिळाला.

आज (१० एप्रिल २०१६) ला शेवटचा तोडा केला. या ७० गुंठ्यातून एकूण ५२ टन माल निघाला. याला मल्चिंग पेपर, ठिबक, खते, औषधे, बियाणे, मजुरी, वाहतूक असा एकूण खर्च १ लाख १३ हजार रू. आला. या ५२ टनाला सरासरी ९ रू. भावाप्रमाणे ४ लाख ६८ हजार रू. उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता ७० गुंठ्यातून ७५ दिवसात ३ लाख ५५ हजार रू. नफा मिळाला.

कलिंगडाचे हे पीक पहिल्यांदाच घेऊन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या प्रतिनिधींच्या मार्गदर्शनानुसार तंत्रज्ञानाचा वापर करून अनुभव नसतानाही हे पीक यशस्वी होऊन भरपूर उत्पादन घेता आले आणि ऊस व कांदा पिकापेक्षा जास्त नफा मिळाल्याने आम्ही अत्यंत समाधानी आहोत. त्यामुळे यापुढील पिकांनाही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी नियमित वापरणार आहे.