जर्मिनेटरच्या नाविण्यपूर्ण प्रयोगातून व डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरून दर्जेदार प्रतीचा कांदा

श्री. नानाभाऊ सिताराम झिंजुर्के,
मु.पो. धामणगाव, ता.आष्टी, जि. बीड,
मो. ९४०५००३०७०/९९६०९०६९८०माझ्याकडे एकूण ८ एकर जमीन आहे. त्यामधील १ एकरमध्ये मी ठिबक वरती गरवा कांदा लागवड केली होती. लागवड करते वेळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कल्पतरू एकरी ३ बॅग बेडमध्ये टाकून ठिबक अंथरूण नंतर कांदा लागवड केली. ३ फुटाचा गाडी वाफा केला होता. या वाफ्याच्या मधून इनलाईन ठिबकची १ लाईन आहे. वाफ्यामध्ये साधारण १ इंच रुंदीच्या ४ ओळी आणि २ रोपात ४ - ५ इंच अंतर याप्रमाणे लागवड केली होती. एकदा ठिबकने व एकदा वाफ्याच्या कडेने सरीतून पाणी देत असे. ठिबकने मधल्या २ ओळीची जागा चांगली ओली होत असे बाजुच्या ओळी अर्धवट ओल्या व्हायच्या तेव्हा सरीतून पाणी दिले की गाडीवाफ्याच्या कडेच्या दोन्ही ओळी भिजायच्या. लागवडीनंतर दुसऱ्या पाण्याला पोटॅश १८:४६:०० ची १ गोणी आणि २०:२०:०० ची १ गोणी खतामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेट १ लि. कालवून खताचा डोस दिला. त्यामुळे निमकोटेड युरीया जसा असतो त्याप्रमाणे जर्मिनेटर कोटेड हे दाणेदार खत तयार होऊन एरवी ड्रेंचिंगने दिलेले जर्मिनेटर ड्रिपर जवळ पडते. मात्र येथे हे दाणेदार खत सर्वत्र समप्रमाणात टाकले गेल्याने सर्व कांद्याला मिळाले. शिवाय केशाकर्षक मुळ्या ह्या जर्मिनेटर व खताकडे आकर्षित होऊन त्यांची वाढ नेहमीपेक्षा जोमाने झाली. परिणामी पात वाढ होऊन हिरवीगार कॅनॉपी मिळाल्याने कांदा अधिक पोसतो. जर्मिनेटरमुळे नेहमीपेक्षा खताची मात्रा निम्मी लागत असून रिझल्ट दुप्पट मिळतो असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. सरांनी सांगितले, असे प्रयोग विविध पिकांमध्ये प्रायोगिक तत्वावर करून त्यांची निरीक्षणे आम्हास कळवावीत. म्हणजे त्यावर भाष्य करून इतर शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील.

नंतरच्या पाण्याला आम्ही ठिबकमधून १ लि. जर्मिनेटर सोडले. लागवडीनंतर २० दिवसांनी जर्मिनेटर, थाईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ५० मिली/पंप याप्रमाणे फवारणी केली. या फवारणीमुळे कांद्याची वाढ चांगल्या प्रकारे झाली व कांद्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे कांद्याला दरवर्षी ४ ते ५ फवारण्या कराव्या लागत असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ३ च फवारण्यात कांदा काढणीस आला. दुसऱ्या फवारणीत थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन प्रत्येकी ६० मिली, राईपनर ४० मिली आणि प्रोटेक्टंट ५० ग्रॅम/ पंपास घेतले. त्यामुळे माना जाड होऊन पातीची उंची वाढून कंबरेला लागत होती. पात हिरवीगार रोग, कीड मुक्त होती. त्यामुळे कांदा पोसण्यास मदत झाली. तिसऱ्या फवारणीत थ्राईवर, क्रोपशाईनर, न्युट्राटोन प्रत्येकी ७० मिली आणि राईपनर ६० मिली/पंपास घेतले. त्यामुळे फांद्याचे पोषण होऊन एकसारखा घट्ट डबल पत्तीचा २० टन कांदा उत्पादन मिळाले. या पिकाचे उत्पादन घेण्यासाठी आम्हाला कंपनी प्रतिनिधी श्री. बाळासाहेब कर्डीले (मो. ९४०३६९९२२८) यांचे मार्गदर्शन मिळाले. सध्या बाजारभाव कमी असल्याने हा कांदा साठवला आहे.