शेवग्याचे बाजारभाव पडले तरी मला अधिक भाव व हमखास ग्राहक म्हणून मी फार समाधानी

श्री. अशोक रामराव कदम,
मु.पो. सांडस चिंचोली, ता. माजलगाव, जि. बीड.
मो. ९५११८००००८


२०१४ साली पुण्यामध्ये किसान कृषी प्रदर्शन पाहण्यास आलो असता मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या स्टॉलला भेट दिली. त्या वेळी मला 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा हा शेतकऱ्यांच्या प्रगतीतला मोलाचा स्तंभ आहे असे समजले. म्हणून मी एक एकर मोरिंगा शेवगा लावण्याचे ठरविले. माझी शेती सांडस चिंचोली, ता माजलगाव, जि. बीड येथे गोदावरी नदी आणि कुंडलिका नदीच्या संगमावर आहे. तेथील अतिशय सखल भागातील १ एकर हलक्या जमिनीत ठिबकवर ६ x ६ फुटावर मी २० ऑगस्ट २०१५ ला शेवगा लागवड केली. त्यानंतर मला माजलगाव येथील तिरुपती कृषी सेवा केंद्रावरून डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. अशोक काटे (मो. ८२७५०१३३८१) यांचा संपर्क झाला आणि मग खऱ्या अर्थाने डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. साहेबांच्या व्हाट्सअप ग्रुप "शेतकरी सल्ला केंद्र" यांचा मी सभासद झालो आणि त्यांच्या वेळोवेळीच्या मार्गदर्शनातून व प्रत्यक्ष पीक पहाणी दौऱ्यातून मी प्रभावीरित्या पिकाची देखभाल व संवर्धन करू शकलो. डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीचे कल्पतरू सेंद्रिय खताचा मी माझ्या सर्वच पिकांना बेसल डोस दिला आहे आणि त्याचे चांगले परिणाम मला आज दिसून आले आहेत.

आजच्या मार्केट परिस्थितीनुसार शेवगा भाजीस चांगला भाव नसला तरीपण माझ्या शेवग्याच्या शेंगांची प्रत अत्यंत चांगली असल्यामुळे मला बऱ्यापैकी पैसे मिळत आहेत. हा शेवगा ८ मार्च २०१६ ला सुरू झाला. आठवड्याला ४०० किलो शेंगा मिळत आहेत. आठवडी बाजारात किरकोळ १५ रू./किलोने भावाने विक्री होत आहे तर होलसेल पाथरी, माजलगाव येथे १२ रू./किलोने जात आहे. सध्या बाजारभाव कमी असले तरी माल अपेक्षेपेक्षा जास्त मिळत आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांच्या वापरामुळे बाजारात माझ्या मालास चांगली मागणी आहे. त्याचे कारण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी सर्व औषधे ही 'नो रेसिड्यू' आहेत, त्यामुळे शेवगा अत्यंत चवदार, पौष्टीक असल्याच्या प्रतिक्रिया माझ्या ग्राहक मंडळींकडून मला येत आहेत.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा व कृषी विज्ञान मासिकाचा दूत

मी माझ्या पंचक्रोशितील माझ्या संपर्कातील सर्व शेतकरी मंडळीना आपले वाचनिय व पत्येक अंक एक संदर्भ ग्रंथ असणारे कृषिविषयक उत्कृष्ट माहितीचे मासिक 'कृषी विज्ञान' याचे वार्षिक वर्गणीदर होण्यासाठी प्रसार करत आहे. त्यामध्ये मला श्री. काटे यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. आम्ही गट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघास भेटी देत आहोत आणि आम्हाला त्यांचा उत्कृष्ट प्रतिसादही मिळत आहे.

सुदृढ आरोग्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

माझी सर्व वाचक बंधुंना विनंती आहे की, सद्य परिस्थितीत आपण खात असलेल्या रसायनयुक्त पालेभाज्यापासून आपल्याला कॅन्सर, दमा, वात यासारख्या दुर्घर रोगांना सामोरे जावे लागत आहे. त्यातून पुर्ण मुक्त होण्यासाठी आपण किमान आपल्या पुरता भाजीपाला जरी रसायन मुक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून तयार केला तर नक्कीच आपण आपली येणारी पिढी ही सुदृढ आणि सशक्त निर्माण करू शकतो आणि पुर्ण शेती जर रासायनिक खते, औषधे विरहीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केली तर निश्चितच साऱ्या मानव जातीचे आरोग्य सुधारेल. यात तीळमात्र शंका नाही.

परत एकदा धन्यवाद डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो.