डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने सनबर्न येत नाही व बाग दर्जेदार

श्री. जयप्रकाश हणमंतराव माने,
मु. पो. येळावी, ता. तासगाव, जि. सांगली


मी व माझे संबंधीत रमेश शंकरराव माने यांची द्राक्ष बाग जवळ - जवळच आहे. त्यामुळे आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी एकत्र औषधे खरेदी करीत असून आम्ही दोघे एकमेकांच्या विचाराने व पिकाच्या परिस्थितीनुसार डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या सर्व औषधांचा किटकनाशक व बुरशीनाशकासोबत माहितीपत्रकाच्या आधारे व कंपनी प्रतिनिधी श्री. विलास पाटील (मो. ९८२२६१६९५१) यांच्या मार्गदर्शनाने वापर करत असतो. काही वेळा १ - २ फवारण्या जादाही घेतो. त्यामुळे माझी बाग सातत्याने ४ वर्षे अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पादन देत आहे. बागेस कोणत्याही इतर समस्या डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे भेडसावत नाहीत. प्रत्येक वर्षी माल जास्त घेतला तरी द्राक्षबाग उत्पादनक्षम व निरोगी राहते. हार्मोनीमुळे डावणीचा प्रभाव कमी होतो (राहत नाही) साधीसाधी औषधे वापरून सुद्धा बागेस कोणताही धोका निर्माण झाला नाही. त्याचप्रमाणे द्राक्ष काळाचे उत्पादनात १० ते १५% वाढ होते. द्राक्ष गरबाज, मण्यांमध्ये असणारा एकसारखेपणा, मण्यास कलर 'व शायनिंग मिळतेच. त्यासोबत माल काढताना होणारी मणीगळ होत नाही. अत्यंत महत्वाचे म्हणजे ८० ते ८५ व्या दिवशी थ्राईवर ५०० मिली + क्रॉपशाईनर ५०० मिली + १०० लि. पाणी याप्रमाणे स्प्रे केल्याने आमच्या बागेत सनबर्न होतच नाही. कित्येक शेतकरी सनबर्न होऊ नये म्हणून जुन्या साड्यांचे अच्छादन करतात. परंतु आमहाला कोणतेही अच्छादन करण्याची वेळ आली नाही.

एरवी साधारणपणे ८० ते ८५ दिवसांच्या अवस्थेत पाणी जेव्हा मण्यात उतरते तेव्हा मणी मऊ होतात. तेव्हा उन्हाचा स्ट्रोक बसतो. त्यामुळे सनबर्न होतो.