डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे कलिंगड उत्पादनात १।। पट वाढ, नफ्यात १ लाख २० हजारची वाढ

श्री. साळीकराम सखाराम फपाळ,
मु.पो. आलापूर, ता. माजलगाव, जि. बीड- ४३११२८.
मो. ९७६४३६५९००



मला एकूण १२ एकर जमीन आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला व इतर हंगामी पिके घेतो. यावर्षी पर्जन्यमान चांगले राहिले. मात्र माझे शेत सरस्वती नदीच्या काठावर असल्यामुळे ८ एकर क्षेत्र जमिनीसहित वाहून गेले. मागच्या २ ते ३ वर्षापासूनचा सतत दुष्काळ आणि यावर्षी अशी परिस्थिती उद्भवल्यामुळे नैराश्य आले, परंतु ऐकले होते जिथे हरवले तिथेच सापडते' अशा विचार चक्रामध्ये टरबूज लागवड करण्याचा निर्णय घेतला.

लागवडीसाठी मी सिंजेंटा कंपनीचे शुगरक्वीन हे वाण निवडले. दि. ३ डिसेंबर २०१६ रोजी ७ पॉकीटे (५० ग्रॅमची) बी आणि जर्मिनेटर १०० मिली २ लि. पाणी या द्रावणामध्ये टाकून १२ तास बियाणे भिजवत ठेवले. त्यानंतर बी बाहेर काढून सावलीत सुकवले व कोकोपीट -ट्रे मध्ये बियाण्याची लागवड केली. डिसेंबर महिन्याची थंडी असतानाही बिज प्रक्रिया केल्यामुळे बियाणे ७२ तासांमध्ये उगवले व ९९% जर्मिनेशन झाले. त्या दरम्यान (रोपे लागवडीस तयार होईपर्यंत) मी शेतीची तयारी केली. मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी २००७ पासून वापरत आहे. मात्र कलिंगडचे अधिक उत्पादन घेण्याकरिता मी कंपनी प्रतिनिधी श्री. सतिश बुरंगे (मो. ८३०८८५१३८८) यांना भेटलो व नियोजन केले.

त्याकरित सुरुवातीचा डोस (बेसल डोस) १०:२६;२६ १२५ किलो निंबोळी पेंड ७५ किलो, कल्पतरू १५० किलो, दाणेदार ३०० किलो सुक्ष्म अन्नद्रव्ये १० किलो बेडमध्ये भरले व ५ फुटाच्या अंतराने बेड ओडले आणि ड्रीप टाकून वर मल्चिंग पेपरने बेड झाकून घेतले. बी लागवडीपासून १६ व्या दिवशी रोपांची ४४ गुंठ्यामध्ये लागवड केली व त्याच दिवशी जर्मिनेटर १०० मिली १५ लि. पाण्यामध्ये टाकून ड्रेंचिंग केली. नंतर १६ व्या दिवशी सप्तामृताची फवारणी (जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम, न्युट्राटोन, हार्मोनी, स्प्लेंडर) केली त्यानंतर २६ व्या दिवशी जर्मिनेटर २ लि. ड्रीपमधून सोडले. त्या दरम्यान बोल्लो १५ मिली (नागअळी करिता) व थायमोथोक्सान १० ग्रॅम घेवून प्रति पंप फवारणी केली. त्याच दरम्यान १९:१९:१९ एका वेळेस ३ किलो याप्रमाणे एकूण १८ किलो सोडले.

३० व्या दिवशी हार्मोनी ३० मिली, प्रिझम ४० मिली व थायमोथोक्सान १० ग्रॅम प्रति पंप वापरून फवारणी केली. नंतर ३५ व्या दिवशी सप्तामृताची फवारणी केली व अमोनिअम सल्फेट ३ वेळा ५ - ५ किलो प्रति दिवसाप्रमाणे १५ किलो ड्रीपमधून सोडले.

लागवडीपासून ४० व्या दिवशी फुल चालू झाले असताना जर्मिनेटर २।। लि. ड्रीपमधून सोडले व ४० व्या दिवशी चौथी फवारणी थ्रीप्स व पांढऱ्या माशीकरिता कोडा लॅबॉरेटरिजचे ड्रॅगन ३० मिली, थ्रिलर ३० मिल १५ लि. पाण्यामध्ये टाकून फवारणी केली. ४२ व्या दिवशी फुलगळ होऊ नये म्हणून १३:४०:१३ ३ किलो २ वेळा ड्रिपमधून सोडले व कॅल्शियम नायट्रेट ३ किलो व बोरॉन १ किलो २ दिवसाआड असे एकूण १८ किलो कॅल्शियम नायट्रेट व ६ किलो बोरॉन ड्रिपमधून सोडले. ४४ व्या दिवशी प्रोटेक्टंट -पी ५० ग्रॅम + हार्मोनी ३० मिली + जर्मिनेटर ५० मिली + प्रिझम ५० मिली + थ्राईवर ५० मिली + क्रॉपशाईनर ५० मिली + स्प्लेंडर २० मिली अशी सप्तामृताची फवारणी केली. ४६ व्या दिवसानंतर १२:६१:०० ३ किलो आणि ००:००:५० १ किलो एक दिवसा आड ६ वेळेस सोडले. ५० व्या दिवशी बी.एस.एफ. चे हेडलाईम ८ ग्रॅम + थायमोथोक्सान १० ग्रॅम + ड्रॅगन ३० मिली + थ्रिलर ३० मिली/पंप अशी फवारणी केली. ६५ व्या दिवशी ब्ल्युकॉपर ३० ग्रॅम + फिप्रोनिल ३० मिली + थायमोठोक्सान १० ग्रॅम फवारणी केली. ६८ व्या दिवसापासून ००:५२:३४ ३ किलो प्रमाणे ८ वेळेस असे एकूण २५ किलो सोडले व ७० व्या दिवशी राईपनर २ लि. ड्रीपमधून सोडले. ८० व्या दिवशी फॉस्फेरिक अॅसिड १ लि. ड्रीपमधून सडोले व फॉलीक्युअर ८ ग्रॅम + ड्रॅगन ३० मिली + अॅडव्हाजर ३० मिली प्रति पंप टाकूण फवारणी केली. ८० व्या दिवसापासून ००:००:५० दिवसाड ३ किलो प्रमाणे १५ किलो सोडले. अशा तऱ्हेने माझा एकूण खर्च ७०,००० रु. झाला व मला एकूण ४४ गुंठ्यामध्ये ४८ टन कलिंगडाचे उत्पादन मिळाले. त्यामध्ये ३३ टन माल ए- ग्रेडचा निघाला. (साईज ३ ते ६ किलोच्या दरम्यान होती.) ३३ टन मालाला ७५५५ रु./टन भाव मिळाला. त्याचे २,४९,३१५ रु. झाले व १५ टन मालास ४००० रु./टन भाव मिळाल्याने त्याचे ६०,००० रु. असे एकूण मला ३,०९,३१५ रु. उत्पन्न झाले. मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी नियोजनबद्ध वापरल्यामुळे माझ्या उत्पादनामध्ये दीडपट (१५ ते १८ टन) वाढ झाली. त्यामुळे मला किमान १,२०,००० रु. चा अधिक फायदा झाला. त्यामुळे मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानतो व धन्यवाद देतो.