डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे एकरी १५ क्विंटल ४२ किलो दर्जेदार कापूस

श्री. दत्तात्रय विनायकराव बेरगुडे, मु.पो. दैठणा बु, ता. परतूर, जि. जालना - ४३१५०१.
मो. ९७६५२४९५४२


डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी श्री. अशोक काटे यांच्या मार्गदर्शनातून यंदाच्या हंगामात मी एकरात १५ क्विंटल ४२ किलो हे निव्वळ जैविक कपाशी उत्पादन घेतल्याचा अभिमान आहे. त्याचे कारण ही तसेच आहे, की मी जो कापूस उत्पादीत केला त्यापासून नुसता कपडाच नाही तर आपल्या आहारात खात असलेले तेल आणि जनावरांना पेंड सुद्धा मिळते आणि एरवी कपाशीवर अत्यंत जहरीले (विषारी)रसायने फवारणी जात असल्याने त्यापासून तयार होणारा कापूस, तेल, पेंड ह्यामध्ये हे विषारी घटक येतात व ते मानव व प्राणीमात्रांना हानिकारक ठरतात. परंतु माझ्या कपाशीपासून मिळणार कापूस, तेल व पेंड ही अतिशय सकस आहे.

मी संकरीत अंकुर व सुवर्णा कपाशीची लागवड ९ जून २०१६ ला १ एकरमध्ये ५ x १.५ फुटावर केली होती. जमीन भारी काळी आहे. याला १०:२६:२६, युरीया सोबत कल्पतरू खताच्या ४ बॅगा वापरल्या. तसेच काटे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे सप्तामृत व किटकनाशक, बुरशीनाशक फवारत होतो. त्यामुळे सुरुवातीपासून कापूस निरोगी व जोमदार होता. फुलपात्याही नेहमीपेक्षा जास्त होत्या डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे गळ कमी झळयाने फळधारणा जास्त झाली होती. बोंडे चांगली पोसली होती.

आता यावर्षीच्या म्हणजे २०१७ -१८ च्या हंगामात मी १००% डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करूनच घरचा भाजीपाला, भुईमूग, ऊस, सोयाबीन ही सर्व पिके घेणार आहे. मला ह्या तंत्रज्ञानाचा व 'कृषी विज्ञान' मासिकाचा अत्यंत सकारात्मक परिणाम झाला आहे.