मोसंबी व हरबऱ्यास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा रिझल्ट चांगला

श्री. अतुल दिंगबर नवले,
मु. पो. खालापुरी, ता. घनसावंगी, जि. जालना - ४३१२०३.
मो. ९९२२११३७७६


मी अतुल दिगंबर नवले रा. खालापूरी येथील रहिवाशी असून माझे एकूण क्षेत्र १८ एकर आहे. त्यामध्ये मोसंबी ६ एकर आहे. ऊस ४ एकर आहे. तसेच कापूस ८ एकर असून मी चालू वर्षी नवीन १।। वर्षाच्या ३ एकर मोसंबीच्या ८५० लहान झाडात हरबरा विजय - १२ या जातीचे मागील वर्षीचे बियाणे जर्मिनेटरची बिजप्रक्रिया करून पेरले. त्यामुळे उगवण १००% झाली. त्यानंतर १ महिन्याच्या अंतराने पहिली फवारणी जर्मिनेटर + निंबोळी अर्क + प्रिझमची केली व फुलाच्या अवस्थेत दुसरी फवारणी वरील प्रमाणेच घेतली. त्यामुळे फुलाच्या संख्येत मोठ्या प्रमाणत वाढ होऊन फुल गळ न होता घाट्यांची संख्या वाढली. त्यामुळे ३ एकर क्षेत्रात ५० किलो बियाण्यापासून २५ क्विंटल इतके हरबरा उत्पादन मिळाले.

८ वर्षाची मोसंबीची जुनी १।। एकर बाग आहे. लागवड १८' x १८' वर आहे. तिचे आतापर्यंत ६ बाहर घेतले आहेत. चालू वर्षी डिसेंबरमध्ये ताण देऊन ३० जानेवारी २०१७ ला पहिले पाणी दिले. यावर्षी या मोसंबीला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा प्रथमच वापर सुरू केला. जर्मिनेटर ड्रेंचिंग करून प्रिझमची वरून फवारणी केल्याने बहार अतिशय चांगला फुटला. पुढेही जर्मिनेटर, प्रिझम, निंबोळी अर्काची फवारणी केल्याने गळ झाली नाही. सध्या (एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात) लिंबाएवढी फळे आहेत. एकूण १५० पैकी काही झाडे जाऊन १४० झाडे उत्पादनक्षम आहेत. यापासून दरवर्षी ४ - ५ टन माल निघत होता. मात्र यावर्षी दरवर्षीपेक्षा बहार खुप लागलेला असून मोसंबी फळे पोसण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या चालू आहेत. त्यामुळे ७ - ८ टन उत्पादन मिळेल अशी खात्री आहे. यासाठी कंपनी प्रतिनिधी गणेश कसाब मो. ७७९८६१०६५० यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

हरबरा, मोसंबीप्रमाणेच यापुढे मी पुढील वर्षीच्या पिकांनादेखील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर माझ्या सर्व क्षेत्रामध्ये करणार आहे.