दुर्लक्षित फार्म हाऊस बहरले, ५ 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून ५ हजार

डॉ. कविता गंगावणे,
मु.पो. वंजारवाडी, ता. कर्जत, जि. रायगड.
मोबा. ९८२२१४६३५६आमच्याकडे आंबा ६० झाडे, नारळ ४०, चिकू १० पेरू, आवळा १०, 'सिद्धीविनायक' शेवगा ९ झाडे आहेत. या झाडांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या महिन्यातून २ वेळा फवारण्या करतो आणि स्लरी (सिताफळ, कडूनिंब, करंज यांची पाने व गोमूत्र, शेण, दही, कडधान्याचे पीठ यांची) देतो. मी डॉकटर असून मिस्टर इंजिनीअर आहेत. आम्ही पुण्यात राहतो. आठवड्यातून अल्टरनेट १ - १ जण जावून शेती पाहतो. तेथे एके कुटुंब ठेवले आहे. आम्ही ५ वर्षापुर्वी (२००९) हा फार्महाऊस विकत घेतला आहे. फळझाडे जुनीच आहेत. पहिल्या मालकाने भरपूर उत्पादन घेवून दुर्लक्षित झाल्यावर बाग विकला. जमीन पूर्ण निकृष्ट झाली आहे. त्यामुळे मागील ३ - ४ वर्षापर्यंत आम्हाला उत्पादन काहीच मिळाले नाही. त्यानंतर मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे स्प्रे आणि स्लरीचा वापर सुरू केला. त्याचे रिझल्ट आम्हाला चांगले मिळाले. गेल्यावर्षी आंब्याचा मोहोर पूर्ण गळून गेला. यावर्षी वेळेवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्याने मोहोर छान लागला आहे. शिवाय गळ अजिबात झाली नाही. फळे धरण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी पुढील फवारणीकरिता आज (१५ फेब्रुवारी २०१४) सप्तामृत व स्प्लेंडर घेवून जात आहे. या तंत्रज्ञानाने आवळ्याला कित्येक वर्षातून प्रथमच यावर्षी फळे लागली आहे. पेरूदेखील अतिशय चांगला येतो. पेरू फळ खुप मोठे आहे. चिकू भरपूर येतो. आतापर्यंत सर्व फळे मित्रपरिवार व नातेवाईकांना वाटली. विक्री करण्यास आम्हाला वेळ नाही. शेवगा यावर्षी खूपच चांगला आला. ९ झाडांपैकी ४ झाडे लहान असून ५ झाडांना शेंगा खूप लागल्या आहेत. आमच्या कामगाराने त्या विकल्या तर १.५ रु. ला शेंग जावून ५ हजार रु. झाले. आपल्या शेवगा पुस्तकावर दाखवल्याप्रमाणे शेंगा लागलेल्या आहेत.