कृषी उत्पन्न बाजार समितीला पर्याय व नवीन मर्केटींगच्या योजनेतून देशभर प्रचंड रोजगार उपलब्ध

प्रा. डॉ. वि.सु. बावसकरशेतकऱ्यांनी फक्त शहराच्या बाजारपेठेवर अवलंबुन न राहता आपल्या गावाच्या १० ते २० कि. मी. परिसरात सोमवार ते रविवार असा ७ ही दिवस कुठेना कुठे 'आठवडी' बाजार भरत असतोच. तेथे त्या गावातील व परिसरातील वाड्यावस्त्यावरील लोक हे आठवड्यातून एकदा बाजार करण्यासाठी येत असतात. ते पुर्ण आठवड्याचा भाजीपाला व किराणा खरेदी करत असतात. शेवग्याची भाजी आठवड्यातून दोन वेळा केली तर फायदाच होतो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापलेल्या दर्जेदार भाजीची आवड, चव व रंग हे त्यांच्या स्मरणात राहते. त्यामुळे कायमचे ग्राहक मिळते. शिवाय मालाला भाव चांगला मिळतो. माल लवकर संपतो. माल उरण्याची (शिल्लक राहण्याची) शक्यता नाही. त्यामुळे माल वाया जात नाही. गिऱ्हाईक आपल्या मालाची वाट पाहते. शेतकऱ्याने बाजारात आणलेला माळ पाहून त्याच्या डोळ्यात आंदन दिसतो. असे अनेक पिकांमध्ये देशभरातील विविध भागातील हजारो शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितले, कळविले आहे.

आठवडी बाजार हा १० ते २० कि.मी. च्या परिसरातील असल्याने वाहतूक, वेळ, खर्च वाचतो व गावोगाव या शेवग्याचा आणि तंत्रज्ञानाचा परिचय नवनवीन पिकासाठी हंगामवार पालेभाज्या, फळभाज्या फळपिके अशा पिकांमध्ये हजारो शेतकऱ्यांनी आम्हाला कळविले आहे. म्हणून कृषी उत्पन्न बाजार समित्या कमी झाल्या तरी शेतकऱ्यांना हा पर्याय निर्माण होईल. आम्ही २० वर्षांपासून सांगत आहोत की, तालुकामार्ग, जिल्हाचे मुख्य रस्ते, राज्यमार्ग व देशाच्या महामार्गावर याठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलांना देशभर पत्राचे न गंजणारे २० x १० फुटाचे ४० ते ५० लह फिरते किंवा कायमस्वरूपाचे रोड मार्केटींग स्टॉल (R.M.S.) सबसिडी अथवा पंतप्रधानांच्या योजनेमध्ये ते समाविष्ट करावे. म्हणजे संभाव्य जी स्थिती उत्पन्न होतेय की, बाजार समित्याशिवाय शेतकऱ्यांचे चालत नाही, हे किती खोटे आहे हे त्यावरून सिद्ध होईल. यातून शेतकऱ्यांच्या मुलांना सामर्थ्य, शक्ती, प्रेरणा, आर्थिक स्थैर्य मिळून नवीन उद्योजकतेतून कुटुंबाला स्वास्थ्य मिळेल. शेतकऱ्यांच्या कुटुंबात १२ ही महिने पैसा खेळता राहील. त्यांच्यावर कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबणार नाहीत, आत्मह्त्या होणार नाहीत व तरुण पिढी नोकरीच्या मागे न लागता पिढ्यानपिढ्या उद्योग व्यवसायात रममाण व हमखास यशस्वी होतील, प्रगती करतील. देशातील जी ८० कोटी तरुण पिढी आहे तिला उद्योजकता मिळाल्याने ती वाहवत जाणार नाही. शेतकऱ्यांना कमी क्षेत्रात पिकाचे अधिक पर्याय, त्यांचे मुल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने देशभर निर्माण केले आहेत.