आमची मोसंबी जास्त गोड म्हणून टनाला ६०० ते ८०० रू. भाव अधिक

श्री. रामराव देशमाजी पवार,
मु. सायाळ, पो. कोरेगाव, ता. लोहा, जि . नांदेड


मोसंबीची २५०० झाडे असून त्याला इतर कोणतीही रासायनिक खते न वापरता फक्त कल्पतरू सेंद्रिय खत वापरून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे औषधांची फवारणी केली. प्रथम बहार फुटताना जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५०० मिलीची १०० लि. पाण्यातून फवारणी केल्यामुळे बहार चांगला फुटला, नंतर थ्राईवर, क्रॉपशाईनरची दुसरी फवारणी केल्यामुळे गुंडीगळ झाली नाही. त्यानंतर फळे लिंबू आकाराची असताना थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर प्रत्येकी ७५० मिली २०० लिटर पाण्यातून फवारणी केली आणि चिकू आकाराची फळे असताना थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर प्रत्येकी १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. या फवारण्यांमुळे फुगवण अतिशय चांगली होऊन फळांचा टिकाऊपणा (किपींग क्वॉलिटी) वाढल्याचे आम्ही अनुभवले. उत्पन्न अधिक मिळतेच शिवाय मालाचा दर्जाही चांगला असल्यामुळे इतरांपेक्ष भावही जादा मिळतो. याचा अनुभव मागील आठवड्यात नागपूर मार्केटला आला. तेथे मोसंबीचा ५ हजार ते ५२०० रू. /टन भाव असतान आमची मोसंबी ५८०० रू./टन भावाने विकली गेली. याला एकमेव कारण ठरले ते म्हणजे डॉ. बावसकर तंत्रज्ञानाने मोसंबी चमकदार अधिक गोडीची होती. त्यामुळेच ६०० -८०० रू./टन भाव आम्हाला जादा मिळाला.