अति पावसातही आमच्या कपाशीस ६० ते ६५ बोंडे व नवीन फुलपात्य

श्री. विलास धोंडाबाजी शेंडे, मु. घाटसावली, पो. दारोडा, ता. हिंगणघाट, जि. वर्धा,
मोबा. ९७६४२७०८४१


आम्ही १४ जून २०१२ रोजी ११ एकर मध्यम व काही भारी काळ्या जमिनीत कापसाची लागवड केली आहे. मल्लिका २६० जय वाणाची ७ एकरमध्ये आणि ए.टी.एम.ची ४ एकरमध्ये ३॥' x १॥' वर लागवड आहे. पाणी पाटाने देतो.

कपाशीला गेली ३ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे. त्यामुळे प्रतिकूल हवामानातही खात्रीशीर उत्पादन मिळत आहे. तसेच फरदडचे ही उत्पादन उत्तम प्रतीचे व इतरांच्या लागवडी च्या उत्पादनापेक्षाही जास्त उत्पादन मिळते. म्हणून चालू वर्षी लावलेल्या कपाशीलादेखील हेच तंत्रज्ञान वापरात आहे.

सप्टेंबर अखेरपर्यंत कपाशीला डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच्या ३ फवारण्या केल्या आहेत. तसेच जर्मिनेटरचे २ वेळा आळवणी केले. त्याचा फायदा अतिशय चांगला झाला. कारण यंदा विदर्भात मोठ्या प्रमाणात आणि अधिक काळ (जवळपास २ महिने) पाऊस झाल्याने भारी काळ्या जमिनीत पाणी सतत साचून राहिले. पाण्याचा निचरा न झाल्याने पांढरी मुळी अकार्यक्षम झाली. परिणामी कपाशीची वाढ खुंटली, पानझड झाली. बऱ्याच लोकांच्या कपाशीला रोगाचा प्रादुर्भाव झाला. फुलपात्या, बोंडे लागली नाही. ज्यांच्या कपाशीला १० -२० बोंडे लागली ती पोसत नाही अशी परिस्थिती आहे. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी सुरूवातीपासून वापरल्याने आमची कपाशी ५॥ फुट उंचीची, अधिक फुटवा होऊन फुल्पत्यांचे प्रमाण चांगले आहे. प्रत्येक झाडावर ६० ते ६५ बोंडे आहेत. तसेच अजून नवीन फुलपात्या लागत आहेत. कोणत्याही रोगाचा किडीचा प्रदुर्भावे नाही. कपाशीला बोंडे पोसण्यासाठी अजून १ - २ फवारण्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या होतील.

आम्हाला दीड एकर बटाटा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने लावायचा आहे. त्यासाठी आज (दि. १३/१०/१२) सरांचे मार्गदर्शन घेण्यास आलो आहे.

आमचे कपाशीचे प्लॉट पाहून चालूवर्षी श्रीकांत बापुरावजी महाजन, मु. पो . कुटकी(हिंगणघाट) मोबा. ९८५०९७८७५९ हे देखील त्यांच्या १५ एकर कपाशीवर डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत आहेत.