जुन्या संत्रा झाडांना ८०० - ९००, नवीन झाडांवर १००० -१२०० फळे

श्री. सुनिल दामोदरराव खुळे,
मु. पो. कोदोरी, ता. चांदुरबाजार, जि. अमरावती.
मोबा. ९७६४२८१९८५


डिसेंबर २०११ मध्ये आमच्याकडील ३ हजार संत्र्याच्या झाडांचा आंबे बहार धरला होता. मात्र बहार सेटिंगपुर्वीच फळांची गळ मोठ्या प्रमाणात होऊ लागली.मार्च २०११ मध्ये अमरावती येथील कृषी प्रदर्थानामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती घेऊन कृषी विज्ञान मासिकाची वार्षिक वर्गणी भरली होती. मासिकाचे नियमित वाचन करत होतो. त्यानंतर पुणे ऑफिसशी संपर्क साधून अमरावती येथील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे विक्रेते सोनाली ट्रेडर्स यांच्याकडून थ्राईवर, क्रॉंपशाईनरची फवारणी करण्याचे ठरविले. मात्र ३ हजार झाडांसाठी खर्च जादा येत असल्याने प्रयोगादाखल ५०० झाडांवर फवारणी घेण्यासाठी थ्राईवर, क्रॉंपशाईनर २ - २ लि. घेऊन गेलो.या ५०० झाडांपैकी २५० झाडे २० - २५ वर्षापुर्वीची जुनी आहेत . तर २५० झाडे नवीन होती. तर या फवारणीचा अतिशय चांगला रिझल्ट मिळाला. फळगळ ताबडतोब थांबली. त्यांनंतर पुढे फळे चिकूच्या आकाराची झाल्यावर राईपनर, न्युट्राटोनची फवारणी केली तर फळांची साईज बाकीच्या बागेपेक्षा अधिक मिळाली. फळांना शायनिंगदेखील जबरदस्त होती.

७- ८ वर्षाच्या नवीन झाडांवर फळे १००० - १२०० होती. त्यामुळे साईज थोडी लहान मिळाली. एका किलोला ८ ते ९ फळे बसत होती. तर जुन्या २० ते २५ वर्षाच्या झाडांवर ८०० ते ९०० फळे होती. त्यांची साईज चांगली मिळाली. ती फळे एका किलोत ६ ते ७ बसत होती. १ हजार फळांना २ हजार रू. भाव मिळला. तर लहान फळांना १२०० ते १३०० रू. भाव मिळाला.

काड्या झालेल्या पळाटीला बोंडे,

फरदडचा ४ एकरात ३६ क्विंटल उतारा

संत्र्याच्या अनुभवावरूनच कपाशीच्या फरदसाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरले. गेल्यावर्षी ७ एकर कपाशी लावली होती. मल्लिका गोल्ड, पारस ब्रह्मा आणि डेनियम कंपनीच्या वाणाची लागवड १७ जून २०११ ला केली होती. लागवड भारी काळ्या जमिनीत ५' x १' वर होती. यातील ४ एकर क्षेत्रातून पहिल्या दोन वेच्यापासून एकरी ८ क्विंटल उतार मिळाला. मात्र सप्टेंबरमध्ये पांढऱ्या, माशीचा मावा, तुडतुड्यांच्या प्रादुर्भाव शाल आणि पाऊस नसल्याने कपाशीकडे थोडे दुर्लक्षही झाले. त्यामुळे रोग किडीने पाने झडून कपाशीच्या फक्त काड्याच राहिल्या. तर कड्या झालेल्या ४ एकर कपाशीवर कॉटन थ्राईवर,प्रिझम,प्रोटेक्टंट फवारले तर नवीन फुटवा जोमाने निघाला. याच अवस्थेत उशीराचा पाऊस झाल्याने फुटवा वाढला. नंतर फुलपात्या लागतेवेळी कॉटन थ्राईवर,क्रॉंपशाईनर फवारले. त्याने फुलापात्यांची गळ न होता बोंडे लागली. बोंड पोसण्यासाठी राईपनर, न्युट्राटोनची फवारणी घेतली तर पहिल्या पिकापेक्षा फरदडची बोंडे अधिक लागून पोसली. त्यामुळे सुरूवातीपेक्षा उतार जादा मिळाला. सुरुवातीला ४ एकरातून ३२ क्विंटल उत्पादन मिळाले होते. तर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने फरदडपासून ४ एकरात ३६ क्विंटल उत्पादन मिळाले.

१५ एकर सोयाबीन, उडीद, कपाशी, संत्र्यासाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञान

आता हे तंत्रज्ञान चालूवर्षी सोयाबीन, उडीद, कपाशी, संत्रा या पिकांवर वापरत आहे. तसेच या पिकांसाठी कल्पतरू खत १ टन घेतले आहे.

चालूवर्षी २५ मे ते ७ जूनपर्यंत कपाशीची लागवड ४॥' x १' वर केली आहे. आतापर्यंत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे ३ स्प्रे घेतले आहेत. कल्पतरू वापरले आहे. सध्या कपाशीला फुलपात्या लागून बोंडे पोसत आहेत.

सोयाबीन २५ एकर आहे. त्यातील १५ एकरवर थ्राईवर, क्रॉंपशाईनर फुलकळी अवस्थेत फवारले. नंतर शेंगा भरताना राईपनर, न्युट्राटोन फवारले, तर दाणे टच भरले. शेंगाचा लाग भरपूर लागला आहे. बीजप्रक्रियेला जर्मिनेटर वापरले होते तर उगवण १००% झाली. ९३०५ वाणाचे सोयाबीनची काढणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल. बाकीच्या सोयाबीनला शेंगा कमी लागल्या आहेत व काढणीसही वेळ आहे.