उसाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी अधिक उत्पादन, अधिक फायदा

श्री. दिपक रघुनाथ जाधव,
मु. पो. खोरीभाग (वाटेगांव), ता. वाळवा, जि. सांगली,
मोबा. ७३८५९५४९०७


माझा भाऊ गुजरात वापीला कंपनीत नोकरी करत आहे. मी सुद्धा एका सेंद्रिय खत कंपनीत काम करत होतो. आम्ही दोघेही बाहेर असल्याने आणि वडील पण गवंडीकाम करत असल्याने शेतीवर मात्र तितकेसे लक्ष नव्हते. शेती वाट्याने दिली होती. त्यातून उत्पन्न फारच कमी मिळायचे. म्हणून मी स्वत: च आमची ३.५ एकर शेती करायचे ठरवले आणि जॉब सोडला. कंपनीच्या माध्यमातून अगर प्लॉटवर गावात बऱ्याचवेळा श्री. कापसे यांच्याशी भेट व्हायची. मागच्या ६ -७ महिन्यांपूर्वी आमच्या शेजारच्या प्लॉटवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरली होती. तो प्लॉट माझ्या प्लॉटपेक्षा चांगला होता. माझा ऊस बांधणीला आल तरी एकशिवडी होता. त्यावेळी श्री. कापसेंच्या सल्ल्यानुसार जेठा कापून घेऊन युरिया व मॅग्नेशियाम सल्फेट एकरी २ - २ पोती टाकून त्यावर जर्मिनेटर व प्रिझम प्रत्येकी ८० मिलीची आळवणी घातली. तेवढ्यावरच फुट अतिशय चांगल्याप्रकारे झाली. प्रत्येक फुटावा जोमदार रसशीत निघाला. पानांना काळोखी पण चांगली आली. उलट शेजाऱ्यापेक्षा माझा प्लॉट उठून दिसायला लागला. नंतर १ महिन्याने जर्मिनेटर + थ्राईवर + प्रिझम + प्रोटेक्टंट पावडर प्रत्येकी ७० मिलीची फवारणी १५ दिवसात २ वेळा घेतली. लागवडीचा एक डोस दिला. तेवढ्यावरच ऊस बांधणीला आला. बांधणीच्यावेळी कल्पतरू आमच्या येथून लांब कोल्हापूरला असल्याने इच्छा असूनसुद्धा वापरू शकलो नाही. त्याऐवजी सेंद्रिय खत ६ पोती + डीएपी ४ पोती + पोटॅश ३ पोती + दुय्यम खत कॅल्शिमॅक्स २ पोती असा डोस घातला. बांधणीनंतर पाणी फिरवल्यावर थ्राईवर ८० मिली + राईपनर ५० मिली + प्रिझम ८० मिली + न्युट्राटोन ५० मिली + किटकनाशक ३० मिलीची फवारणी घेतली. ३ आठवड्यात पानाची रुंदी काळोखी खूपच वाढली. सध्या तर माझ्या पांची रुंदी ४ बोटे एवढी आहे. त्याचा फोटोपण श्री. कापसेंनी काढून घेतलाय. हे मी एवढ्यासाठीच सांगतोय, कारण ८६०३२ जातीच्या उसाची पाने नेहमी उभी वाढतात. आडवी कधीच वाढत नाहीत. पण हे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीनेच शक्य झाले. कारण जेवढी पानाची रुंदी जास्त तेवढे प्रकाशसंश्लेषण चांगल्या प्रकारे होणार आणि जेवढे प्रकाशसंश्लेषण जास्त तेवढे जास्त अन्न तयार होणार, हे आम्हाला आधीच्या कंपनीत ट्रेनिंगमध्ये शिकवलेलेच होते. पण हे आता प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. किमान एका गुंठ्याला सव्वादोन ते अडीच टनाच्या दरम्यान उतार नक्की पडणारच असा मला विश्वास आहे.