पिवळा पडलेला स्वीटकॉर्न हिरवागार, चवदार कणसे व भाव अधिक

श्री. अजितकुमार रतिलाल शहा,
मु. पो. इंडी , ता. इंडी, जि. विजापूर. (कर्नाटक),
मोबा. ०९५९१४८४६६३


किसान प्रदर्शनामध्ये डॉ. बावसकर तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळाल्यावर कृषी विज्ञान मासिकाची वर्गणी भरून अंक चालू केला. नंतर ऑक्टोबर २०११ मध्ये स्वीटकॉर्न मका ३० गुंठ्यामध्ये काळ्या जमिनीत २' x १' वर लावली होती. ती १५ ते २० दिवसांची झाली तरी सुरूवातीपासून पिवळी पडलेली मका सुधारत नव्हती. म्हणून डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरून काय फरक पडतो हे पाहण्यासाठी कट्टे अॅग्रो, मंगळवेढा (जि. सोलापूर) येथे गेलो. त्यांचेकडून माहिती व कल्पतरू खत ५० किलोच्या ५ बॅगा आणि जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर प्रत्येकी १ लि. घेऊन गेलो. कल्पतरू खत २ बॅगा स्वीटकॉर्नला वापरल्या व वरील औषधांच्या ३ फवारण्या केल्या.

स्वीटकॉर्न हे पीक आमच्या भागात नवीनच केले होते. आमच्याकडे हे पीक घेतले जाता नाही. त्यामुळे घरची माणसे म्हणत, "आपल्याकडे हे पीक यशस्वी होणार नाही कशाला करता ? " त्यातच हे स्वीटकॉर्न उगवणीनंतर पिवळे पडू लागले. त्यामुळे हे पीक आता वाया जाणार आणि त्यात भर म्हणून काहीतरी औषधे आणून विनाकारण खर्च वाढवत आहात असे म्हणू लागले. मी मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली, तर पहिल्या फवारणीतच पिवळेपणा जाऊन मका हिरवीगार झाली. पहिल्या फवारणीचा खात्रीशीर रिझल्ट मिळाल्यावर पुढे २ फवारण्य १५ -१५ दिवसाला केल्या. तर ७० दिवसात काढणी सुरू झाली. माल ६० - ६५ दिवसातच तयार झाला होता. पण आमच्या भागात हे पीक नवीनच असल्याने विक्रीस सुरुवातीस अडचणी आल्या सुरुवातीला ही मका कोण घेत नव्हते. मात्र नंतर जसजशी याची चव लोकांना माहित झाली तेव्हा इंडीपासून १॥ किमी वर प्लॉटवर येऊन साहेब लोक स्वत: येऊन १० रू. प्रमाणे १० -१५ कणसे घेऊन जाऊ लागले. तरी पुढे - पुढे मका संपेना अशी वाटू लागल्यावर मिरज (सांगली) च्या व्यापाऱ्यांना जागेवरून ५० किलोची १५ पोती दिली. ते व्यापारी महाबळेश्वरला ही मका पाठवितात.

स्वीटकॉर्नची काढणी केल्यावरही चाऱ्याचा मका हिरवागार

एका झाडापासून २ कणसे मिळाली. ५०० ग्रॅमच्या खाली कोणत्याच कणसाचे वजन नव्हते. सर्व कणसांचे वजन ५०० ते ६५० ग्रॅमपर्यंत भरत होते. विशेष म्हणजे या स्वीटकॉर्न पासून कणसे विकून काढणी संपली तरी मका हिरवीगार होती. घरी ३ म्हशी २ खिलार गाई, २ बैल आहेत. त्यांना त्याचा हिरवा चारा म्हणून फायदा झाला.

या ३० गुंठे मक्यापासून ४३ हजार रू. उत्पन्न मिळाले. या अनुभवातून लिंबू (कागदी) ४ एकर आहे. त्याला तसेच उसाला हे तंत्रज्ञान वापरायचे आहे. त्याकरिता सरांचे मारागादर्शन व तंत्रज्ञान घेण्यास आलो आहे.

लिंबू २२' x २२' वर डिसेंबर २०१० मध्ये लावलेले आहे. सध्या २० महिन्याचे आहे. इंडीचे लिंबू प्रसिद्ध आहे. हे लिंबू मोठे, पातळसालीचे असते . आमच्या भागातील ७० % लिंबू दिल्ली, बेंगलोर, गुजरातला जाते.

कल्पतरूच्या अनुभवातून उसाला डॉ. बावसकर तंत्रज्ञान

स्वीटकॉर्नला वापरल्यानंतर उरलेल्या ३ बॅगा कल्पतरू खत उसाला वापरले तर रासायनिक खतापेक्षा खर्च कमी येऊन जमीन भुसभुशीत झाल्याने उसाचे फुटवे अधिक निघाले शिवाय उसाची वाढही चांगली झाली. ऊस जाड कांड्याचा वजनदार मिळाला. त्या अनुभवावरून चालू उसाला डॉ. बावसका तंत्रज्ञान सुरूवातीपासून वापरात आहे. ३ एकर ८६०३२ वाणाचा ऊस १५ दिवसापुर्वी लावला आहे. कांड्या १ डोळा पद्धतीने जर्मिनेटर ची प्रक्रिया करून ५' x १' वर पट्टापद्धतीने लावल्या आहेत. त्याची सध्या संपूर्ण उगवण एकसारखी झाली आहे.