निस्तेज आले डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीने तेजस्वी, अधिक फुटवे व रोगमुक्त

श्री. संतोष सुरेश घोगरे, मु. पो. बावडा, ता. इंदापूर, जि. पुणे.
मोबा. ९४२२४६०८८५


लागवडीनंतर ४ महिन्यांचा आले प्लॉट असताना फुटवे कमी होते. उंचीही कमी होती. पानांवर तेज नव्हते. त्यावेळी नाशिक (मालेगाव) चे श्री. अरुण पवार यांचेकडून मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाली. त्यावरून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी करण्यास सुरुवात केली. प्रथम २० दिवसांनी जर्मिनेटर आणि हार्मोनी चे ड्रेचिंग व थ्राईवर, क्रॉंपशाईनर आणि राईपनरची फवारणी केली. नंतर दर २० दिवसांनी असे ४ वेळा तंत्रज्ञान वापरले. तर प्लॉटमध्ये भरपूर सुधारणा झाल्याचे जाणवले. सध्या फुटवे ४० हून अधिक निघाले असून वाढ २ ते २।। फुट उंचीची आहे. तेजही आले आहे.

१० महिन्यांनी पीक काढेपर्यंत १०० फुटव्यापर्यंत वाढ करायचा प्रयत्न आहे. त्यासाठी सरांचा सल्ला घेण्यास आलो आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे सप्तामृत प्रत्येकी १।। लि. + हार्मोनी ७०० मिली + स्प्लेंडर ७०० मिली २५० लि. पाण्यातून फवारणार आहे. कल्पतरू ३ बॅगा/एकरी देणार आहे. तसेच ऑक्टोबर अखेर वरील स्प्रे पुन्हा घेताना न्युट्राटोन व राईपनर भर देऊन ३०० लि. पाण्यातून फवारणी करा, म्हणजे अपेक्षित रिझल्ट येईल असे सरांनी सांगितले. त्याप्रमाणे वापर करणार आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने टोमॅटो ५ एकर करायचा आहे. त्यासाठी सरांचे मार्गदर्शन घेण्यास आलो आहे.