२ एकर भुईमूग ८० पोते (३५ क्विंटल) उत्पादन
                                श्री. रामगोपाल वासुदेव लाड,
 मु. नायगाव, पो. उमरा, ता. पातूर, जि. अकोला. 
मोबा.
                                ९६३७४४३२२४
                            
                                श्री. गवई यांनी १ मिटींग घेतली. त्यामध्ये भुईमूगाची व गव्हाची माहिती दिली. उत्पन्न
                                कसे वाढेल यासाठी आम्हाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी (अॅग्रो) प्रा. लि. च्या प्रोडक्ट विषयी
                                माहिती दिली. आम्ही मासिकामध्ये प्रोडक्ट विषयी माहिती वाचत होतो. पण कृतीत कधी आणली
                                नाही. श्री. गवई यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही गव्हासाठी जर्मिनेटरचा वापर केला.
                                भाजीपाल्याकरिता पण जर्मिनेटर + थ्राईवर + प्रिझम चा वापर केला. रिझल्ट चांगले मिळाले.
                                २० जानेवारी २०१३ ला भुईमूग
                                पेरण्याचे प्लॅनिंग केले. श्री. गवई यांनी बियाणास जर्मिनेटर लावण्यास सांगितले. पेरणी
                                अगोदर कल्पतरू एकरी १०० किलो शेतात टाकले व सांगितल्याप्रमाणे २० जानेवारी २०१३ रोजी
                                भुईमूगाची लागवड केली. डॉ.बावसकर सरांचे पुणे प्रोडक्ट जर्मिनेटर, थ्राईवर, प्रोटेक्टंट
                                - पी, प्रिझम, क्रॉंपशाईनर, हार्मोनी, राईपनरची फवारणी केली. रिझल्ट चांगल्या प्रकारचे
                                आले व खर्च कमी आला. मला दोन एकरमध्ये ८० पोते शेंगा झाली. एका पोत्याचे वजन ४२ ते
                                ४५ किलो असे होते. इतर शेतकऱ्यांना पण मी सांगितले की, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रोडक्ट
                                वापरून हमखास जास्त उत्पन्न मिळवा व अनुभव घ्या.