प्रतिकूल जमिनीतून डाळींब यशस्वी करण्याची एक आशा !

श्री. बाबुराव आण्णाराव आवटे,
मु. पो. भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर.
मोबा. ९८९०५१३७५१


दोन एकर वर १६ x ८ फुट अंतरावर भगवा जातीचे डाळींब ऑक्टोबर २०१२ मध्ये लावलेले आहे. एक प्लॉट थोड्या प्रमाणात चुनखडीयुक्त आहे. दुसऱ्या प्लॉटची जमीन हलकी मुरमाड आहे. मुरमाड जमिनीत झाडे ४ फुटापर्यंत झालेली आहेत. चुनखडीयुक्त जमिनीतील झाडांची वाढ थोडी कमी २।। ते ३ फुटापर्यंत झालेली आहे. झाडांना एकदा जर्मिनेटर वापरलेले आहे. फुटवे चांगले आलेले होते. आताही झाडे टवटवीत आहेत. पण चुनखडी युक्त जमिनीत झाडांची वाढ थोडी कमी झालेली आहे असे मला वाटते. मध्ये मावा, आळी या किडींचा व करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला. त्याला रासायनिक औषधांची फवारणी केलेली. त्याने किड - रोग लवकरच नियंत्रणात आलेला. एकदा २४ - २४ व युरिया हे झाडांना ड्रीप मधून सोडलेले. झाडांची वाढ चांगली झालेली. येथून पुढे सेंद्रिय खत वापरावे असे ठरवले आहे. आपले मार्गदर्शन हवे. पुर्ण डाळींब शेती सेंद्रिय पद्धतीने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने करणार आहे.