दुर्लक्षित फळमाशीने त्रस्त डाळींब बगाचे ७० हजार

श्री. भारत भाऊराव साळवे,
मु. पो. राशीन, ता. कर्जत, जि. अहमदनगर,
मोबा. ९४२१३२८१०१


भगवा डाळींबाची २।। एकरमध्ये नोव्हेंबर २००९ ला १४', १०' वर लागवड केलेली आहे. जमीन मध्यम व खडकाळ प्रतीची आहे. बागेस ठिबक केले आहे. गेल्यावर्षी पहिलाच बहार धरला होता. मे २०१२ मध्ये ताण देऊन जुनमध्ये पाणी सोडले होते. झाडावर १५ ते २० फळे धरली होती. तोपर्यंत रासायनिक खते दिली होती. पाणी देत असे. फळांचे सेटिंग झाल्यानंतर साधारण १०० - १२५ ग्रॅमची फळे असताना फळ माशीचा प्रादुर्भाव झाला. या अवस्थेत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करू लागलो. कृषी प्रदर्शनातून मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाली. त्यानंतर शेतकऱ्यांचे अनुभव डाळींब पुस्तकातून वाचण्यात आले. त्यावरून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरायचे ठरविले.

१०० - १२५ ग्रॅमचे फळ असताना पहिली फवारणी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंटची केली. त्याने रोगराई कमी जाणवू लागली. फळांची साईज वाढू लागली. म्हणून नंतर थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोनच्या पुन्हा २ फवारण्या केल्या. एवढ्यावर फळांची साईज चांगली मिळाली. चमक आली, परंतु सप्टेंबर - ऑकटोबर मध्ये फळांचे सेटिंग झाल्यानंतर फळमाशीचा जो प्रादुर्भाव झाला होता. तो काही आटोक्यात आला नाही. इतर कामांमुळे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या तीन फवारण्याशिवाय इतर कोणतीच फवारणी करू शकलो नाही. तेवढ्यावरच मिळतील तेवढीच फळे घ्यायचे ठरवले. तर फळमाशीने गळून राहिलेली फळे मात्र चांगल्या आकाराची ४०० ते ४५० ग्रॅमची तर १०% ५०० ग्रॅमच्या पुढची फळे मिळाली. फळांवर चमकदेखील चांगली असल्याने पुणे मार्केटला के.डी. चौधरी यांच्याकडे ९९ रू./किलो मिळाला. त्यावेळी हायस्ट भाव ११५ रू. होता. सरासरी ७० - ८० रू. भाव असताना आमच्या मालाला चमक असल्याने चांगला भाव मिळाला. या बहारापासून दुर्लक्ष होऊनही ७० हजार रू. झाले त्यामुळे सर्व खर्च निघाला. आता दुसरा बहार डॉ. बावसकर तंत्रज्ञानाने घ्यायचा आहे.

त्यासाठी सरांचे मार्गदर्शन घेण्यास आज ६/१०/१३ आलो आहे. चालू बहाराला जुलै - ऑगस्टमध्ये ताण देऊन ३० ऑगस्टला छाटणी संपली. ८ - ९ सप्टेंबरला पाऊस झाला. तेवढ्यावरच बाग चांगली फुटली, मात्र सध्या बागेवर बोकड्या, करपा थ्रिप्सचा प्रादुर्भाव आहे. फुलकळी अतिशय कमी आहे. ४०% झाडांवर फुलकळी नाही. तेव्हा सरांचे मार्गदर्शनानुसार तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे.

सरांनी सांगितल्याप्रमाणे जर्मिनेटर, प्रिझम प्रत्येकी १ लि. १५० लि. पाण्यातून ठिबक द्वारे (ड्रेंचिंग) मुळाला सोडणार आहे आणि कळी निघण्यासाठी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रिझम तसेच थ्रिप्स, डाऊनी, लाल कोळी नियंत्रणासाठी हार्मोनी व स्प्लेंडर फवारण्या आहे. याकरिता जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रिझम प्रत्येकी ५ लि. आणि प्रोटेक्टंट १ किलो व हार्मोनी आणि स्प्लेंडर प्रत्येकी ५०० मिली अशी ९ हजार रू. ची औषधे घेऊन जात आहे. मार्गदर्शनानुसार कळी सेटिंग झाल्यावर पुढील औषधे वापरणार आहे.