कपाशीचा लाल्या जाऊन, कपाशी हिरवीगार ९० ते १०० बोंडे प्रत्येक झाडावर

श्री. शरद आधाळे, मु. पो. पिंपळखेड, (बु.), ता. घनसावंगी, जि. जालना

मी चालूवर्षी ४' x ५' वर कपाशीची लागवड केली आहे. १।। -२ महिन्याची कपाशी असताना लाल्या रोगाने पाने पुर्ण लाल झाली. पुढे बोंडेदेखील लाल पडली. यावेळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. भगवान जैवळ यांनी जर्मिनेटर, कॉटनथ्राईवर व क्रॉपशाईनर फवारण्यास सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार वरील तिन्ही औषधांची प्रत्येकी १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली, तर लाल्या थांबून पाने, बोंडे हिरवी होऊ लागली. म्हणून लगेच १५ दिवसाच्या अंतराने अजून दोन फवारण्या कॉटनथ्रावर, क्रॉंपशाईनर, राईपनरच्या केल्या. त्यामुळे कपाशी पुर्णत: हिरवीगार झाली. फुलपात्या वाढल्या. बोंडे पोसू लागली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत नव्हतो तेव्हा एका झाडावर १५ ते २० बोंडे लागत होती. तर सध्या २२ सप्टेंबर २०१३ पर्यंतच प्रत्येक झाडावर ९० ते १०० बोंडे लागली आहेत आणि प्लॉट पुर्णता रोगमुक्त हिरवागार आहे. ४' x ५' चे दोन झाडातील अंतर पुर्णपणे झाकून गेले आहे. याच अस्थेत शेजाऱ्यांच्या कपाशीची पाने व झाडावरील बोंडांची संख्या ३५ ते ४० आहे. बोंडे लाल व बारीक आकाराची आहेत.

Related New Articles
more...