आले न 'लागता' डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केलेल्या १५ गुंठ्यात मालामाल !

श्री. प्रदीप महिपती पवार, मु.पो. भाटमरळी, ता.जि. सातारा.
मोबा.९९२३२३५८६७


मे २०१० पासून आम्ही आले पिकासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतो. या औषधांचे रिझल्ट अतिशय चांगले असून विशेष म्हणजे ही औषधे विषारी नसल्याने फवारणी करणाऱ्यास अजिबात धोका नाही. त्यामुळे माझ्यासारख्या वयस्कर माणसाला हे सहज शक्य होते.

आल्याला इतरांप्रमाणे जादा खर्च करीत नाही. मोजक्याच खर्चात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सरासरी पेक्षा जास्त आणि खात्रीशीर उत्पादन घेतो. काही लोक अमाप खर्च करतात व उत्पन्न आमच्या उत्पन्नाच्या जवळपासच काढतात तर काहींना तेवढा खर्च करूनही आले 'लागले ' तर ते आटोक्यात आणता न आल्याने उत्पन्नात मात्र खातात व लाखो रू. खर्चाचा बोजा अंगावर येतो.

आम्ही आले लागवडीपुर्वी प्रथम उन्हाळ्यात १५ गुंठे क्षेत्रात २०० बकऱ्यांचे ५ - ६ तळ बसवितो. त्यानंतर नांगरट करून बेड करतो. बेड साधारण ३।। ते ४ फूट रूंदीचे असतात. त्यावर ९ - ९ इंच अंतरावर जर्मिनेटची बेणेप्रक्रिया (जर्मिनेटर १ लि. + १०० लि. पाणी) केलेल्या कुड्या लावतो. त्यानंतर उगवून आल्यावर वितभर झाल्यावर स्प्रिंक्लरने पाणी देतो. स्प्रिंक्लरमुळे पानांवरील कीड रोग धुवून जातो. त्यामुळे पीक काढेपर्यंत स्प्रिंक्लरनेच पाणी देतो. लागवडीपुर्वी गोळी व सुपर खत देतो. यामध्ये सुक्ष्म अन्नद्रव्य १० किलो मिक्स करून देतो. हे खत देताना पानांवर पडू देऊ नये. खत दिल्यावर बांड्याला मातीची भर लावतो.

त्यानंतर सुरूवातीच्या सहा महिन्याच्या काळात आल्याला फार जपावे लागते. यासाठी सुरूवातीचे सहा महिन्यात दर महिन्यास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताच्या फवारण्या हार्मोनीसह घेतो आणि जर्मिनेटर ५०० मिली व हार्मोनी २५० मिलीचे १०० लि. पाण्यातून १५ गुंठे क्षेत्राला ड्रेंचिंग दर महिन्याला करतो. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आल्याची वाढ व फुटवे अधिक होतात. तसेच करपा किंवा पानांवरील टिपके असे रोग आटोक्यात राहतात. ड्रेंचिंगमुळे आल्याला जमिनीतील बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही, त्यामुळे आले लागत नाही.

पुढील ६ ते ९ महिन्याच्या काळात आल्याला हवामान अनुकूल असले तर फवारणीची गरज भासत नाही. मात्र यासाठी प्लॉटचे निरिक्षण वेळच्यावेळी करावे लागते. जर हवामानातील बदलाने आले पिवळे पडल्याचे ठिक ठिकाणी दिसू लागले तर खाली आले लागल्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत ताबडतोब डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन आणि हार्मोनीची फवारणी करतो. तसेच आळवणीतून जर्मिनेतर + हार्मोनी देतो. त्यामुळे लागलेले आले जागेवर थांबविता येते. त्याचा इतरत्र प्रसार होत नाही.

आल्याची काढणी सर्वसाधारण रमजान महिन्याचा १० ते १५ दिवस अगोदर करतो. कारण या कालावधीत पाऊस असतो. काळ्या जमिनीतील आले पावसाळ्यात काढता येत नाही. तसेच मार्केटमधील जुने आले संपत आलेले असते. त्यामुळे या कालावधीत हमखास भाव वाढलेले असतात. आमची जमीन माळरानावर असून बेडमधील चरांची खोली जास्त असल्याने पाण्याचा निचरा लवकर होतो व माती मध्यम प्रतीची असल्याने लवकर सुटी होवून काढणी सोपी होते, ती काळ्या मातीप्रमाणे आल्याला चिकटत नाही. असे हे काढणीचे तंत्र अवलंबत असल्याने आल्याला आम्हाला नेहमी तेजीचे भाव सापडतात.

एक गाडी आले १५ गुंठे, ३ लाख ८० हजार

जून २०१२ ला १५ गुंठ्यात १ गाडी (५०० किलो) बेणे लावलेल्या आल्याचे वरीलप्रमाणे व्यवस्थापन केले होते तर त्याची काढणी केली असता ८ गाड्या आले ऑगस्ट २०१३ मध्ये निघाले होते. त्याला ४८,००० रू./गाडी (५०० किलो) भाव मिळाला होता. त्याचे ३ लाख ८० हजार रू. झाले होते. याला एकूण खर्च ६० हजार रू. आला होता. त्यातील ५०० किलो बेण्यासाठीच ४० हजार रू. लागले होते. बाकी खर्च फक्त २० हजार रू. केला.

१ लाख ९५ हजार १५ गुंठ्यात

त्यानंतर मे २०१३ मध्ये याच पद्धतीने १५ गुंठे आले लावले होते. त्यालाही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले. मात्र मुलीच्या लग्नाच्या धावपळीमध्ये वेळच्यावेळी त्याचा वापर न होता मागे - पुढे झाला. तरी ६.५ गाडी (३२५० किलो) आले उत्पादन मिळाले. त्याला ३० हजार रू./गाडीप्रमाणे भाव मिळाला. त्या आल्याचे यावर्षी १ लाख १५ हजार रू. झाले.

२ वेळच्या अनुभवातून एस.बी.आय मध्ये पैसे भरून डॉ. बावसकर तंत्रज्ञान घरपोच भागवतो

आता चालू वर्षी देखील १५ गुंठ्यामध्ये १ बैलगाडी (५०० किलो) बेणे जर्मिनेटरची प्रक्रिया करून मे (२०१४) महिन्यात लावले होते. तर जर्मिनेटरमुळे उगवण नेहमीप्रमाणे १००% झाली व कोंब लवकर वाढीस लागले. त्यानंतर एकदा जर्मिनेटरची आळवणी व ३ वेळा सप्तामृताची फवारणी केल्यामुळे आल्याची उंची १। ते १।। फूट आहे. गेल्या आठवड्यापर्यंत प्लॉट पुर्णपणे निरोगी होता. मात्र या २ दिवसात २ - ३ ठिकाणी आले लागलेले जाणवत आहे. तेथील आल्याची पाने पिवळी पडली असल्याने ताबडतोब डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे घेण्यासाठी आलो आहे. माझ्याकडे क्रॉपशाईनर, न्युट्राटोन, जर्मिनेटर मागच्यावेळी नेलेले शिल्लक आहे. तरी आज २८ ऑक्टोबर २०१४ ला थ्राईवर ५०० मिली, जर्मिनेटर १ लि., हार्मोनी ५०० मिली, प्रिझम ५०० मिली घेऊन जात आहे. पुढीलवेळी पुण्याला औषधे नेण्यास यायचे जमणार नाही तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी (अॅग्रो) प्रा. लि. चा भारतीय स्टेट बँकेचा खाते नंबर घेऊन जात आहे. त्यावेळी यादीप्रमाणे औषधांची किंमत बँकेत भरून एस. टी. पार्सलने औषधे साताऱ्याला पाठवून देण्याची विनंती आहे.