'स्प्लेंडर' हे खरेच 'स्प्लेंडर' आहे !

श्री. चंदन मधुकरराव खेरडे,
मु.पो.शे.घाट. ता.वरूड, जि.अमरावती.
मोबा. ८८०६४१६४६४


मी एकूण ९५,००० जंबेरी पन्हेरी खुंटाची ७ x ७ सेमी अंतरावर लागवड केली आहे. खुंट लावतांनी २० लि. पाण्यामध्ये जर्मिनेटर ५०० मिली + प्रिझम ५० मिली असे मिसळून त्यामध्ये झाडाच्या म्हणजेच खुंटाच्या मुळ्या १० मिनिटे बुडवून ठेवल्यानंतर त्याची लागवड केली. त्यानंतर मी ८ दिवसांनी १५ लि. पाण्यामध्ये जर्मिनेटर ३० मिली + प्रिझम २५ मिली + स्प्लेंडर १५ मिली याप्रमाणे फवारणी केली.

नंतर जंबेरीच्या खुंटाला (झाडाला) पाणी दिले. त्यानंतर १५ दिवसांनी माझ्या झाडावर मावा, तुडतुडा व माईटचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यामुळे मी पुन्हा १५ लि. पाण्यामध्ये २० मिली स्प्लेंडर व ३०० मिली जर्मिनेटर फवारले. लगेच तिसऱ्या दिवशी पूर्ण झाड स्वच्छ दिसायला लागले व नवीन पालवी (पाने) निघण्यास सुरुवात झाली.

तेव्हापासून मी स्प्लेंडर वापरत आहे. त्यामुळे माझ्या झाडावर मावा, तुडतुडा, माईट तर नाहीच पण लिफमाईनर सुद्धा आली नाही. त्याचबरोबर झाड पण जोराने (गतीने) वाढत आहे. आता मी पूर्ण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे. त्यावर आता मी ९५,००० झाडे (नागपुरी संत्रा) तयार करणार आहे.