कल्पतरू व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीने कापसाचे डवरलेले पीक पाहून समाधान !

श्री. राहुल सुधाकर वाघ, मु.पो. सिलोरी, ता. कळमेश्वर, जि. नागपूर,
मोबा. ९८८११८९०५१


यंदा ३५ एकर कपाशी आहे. अजीत -१५५ वाणाची २० पाकिटे १० एकरमध्ये ठिबकवर ५' x २' वर ४, ५, ६ जून १४ ला पाऊस नसल्याने पाणी सोडून लावली. जमीन मध्यम प्रतीची आहे. उगवल्यानंतर १० - १२ दिवसांनी खूप ऊन तापले. त्याने झाडे सुकल्यासारखी दिसू लागली. खाली मातीत ओल होती मात्र अति उष्णतेने शेंडा, पाने सुकू लागली. म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर ३० मिली + क्रॉपशाइनर ३० मिली/पंपास घेऊन फवारले. त्याने झाडे ताजीतवानी झाली. नंतर जर्मिनेटर एकरी १ लि. ड्रिपवाटे दिली. त्यामुळे झाडांची उंची चांगलीच वाढली. पाऊस उशीरा सुरू झाला तोपर्यंत ३ पाण्यावर कपाशीचे पीक जोमदार आले. जुलै महिन्यात पाऊस झाल्यावर उर्वरित क्षेत्रात जय १० एकर, मल्लिका गोल्ड ६ एकर, कावेरी जादू ३ एकर, एम-५५ ची २ एकर आणि साधी ४ एकर कपाशी १८ ते २० जुलै २०१४ रोजी उशीरा लावली.

या सर्व कपाशीसाठी मी कल्पतरू सेंद्रिय खताच्या १०० बॅगा घेतल्या होत्या. अजीत -१५५ वाणाच्या १० एकर कपाशीला लागवडीनंतर १ महिन्यांनी कल्पतरू सेंद्रिय खत १५ बॅगा, युरीया ४ पोती आणि डी.ए.पी. ५ बॅगा असा खताचा डोस दिला. त्यानंतर पुन्हा १ महिन्यांनी (म्हणजे लागवडीनंतर २ महिन्यांनी) कल्पतरू सेंद्रिय खत १५ बॅगा, डी.ए.पी. ५ बॅगा, १२:३२:१६ च्या २ बॅगा आणि पांढरे पोटॅश ५ बॅगा याप्रमाणात खताचा डोस दिला व या डोसाच्या तिसऱ्या दिवशी मॅग्नेशियम सल्फेट २५ किलो आणि थायग्रीन २५ किलो ड्रीपवाटे दिले.

२ - ४, डी फवारल्याने कपाशीवर आलेली विकृती डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने गेली

अजीत-१५५ वाणाच्या १० एकर कपाशीला मात्र कल्पतरू देवून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सुरूवाती पासून फवारण्या केल्या. माझ्या कपाशीमध्ये २-४, डी फवारल्याने झाडांवर विकृती आली होती. तर लगेच २ - ३ दिवसात म्हणजे कपाशी ५० दिवसांची असताना कॉटनथ्राईवर, क्रॉप शाईनर, प्रिझम, प्रोटेक्टंट, न्युट्राटोन प्रत्येकी ६०० मिली २०० लि. पाणी याप्रमाणे दुसरी फवारणी केली. तर पाने टवटवीत होऊन शेंडा वाढ चालू झाली. आता ७० दिवसाची कपाशी असताना तिसरी फवारणी कॉटनथ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. + हार्मोनी ३०० मिली + २०० लि. पाणी याप्रमाणे केली. तर कपाशी आज मितीस (२५ सप्टेंबर १४) पुर्णपणे निरोगी असून झाडांची उंची ५ - ६ फूट झाली आहे. फुट भरपूर आहे. ५' x २' हे लागवडीतील अंतर पुर्णपणे झाडांनी व्यापले आहे. झाडांवर ४० - ५० बोंडे व नवीन फुलपात्या भरपूर आहेत.

या १० एकर कपाशीला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या एका फवारणीसाठी २० हजार रू. खर्च येत होता. त्यामुळे इच्छा असूनही बाकीच्या २५ एकर क्षेत्रावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी घेऊ शकलो नाही. ही २५ एकरातील कपाशी १।। महिना उशीरा लागवडीची असून हिला फक्त रासायनिक किटकनाशकाच्या २ फवारण्या केल्या आहेत. या कपाशीला फुलपात्या लागल्या असून बोंडं थोडी थोडी (१० -२०) दिसत आहेत.

अजीत - १५५ वाणाच्या कापसाचा मात्र दसऱ्यानंतर वेचा चालू होईल. चालू पीक परिस्थतीनुसार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने एकरी २० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे. या कापसास एकरी १० हजार रू. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवर खर्च झाला असून सुरूवातीच्या वेचणीस किलोला ५ - ६ रू. आम्ही पुढे २ वेचण्या झाल्यावर ८ ते १० रू. किलो कापूस वेचणीची मजुरी द्यावी लागते. जरी पारंपारिकतेपेक्षा थोडा खर्च डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवर वाढला तरी उत्पादनात मात्र भरीव वाढ होईल असे वाटते. यावर्षीच्या अनुभवानंतर व पुरेसे भांडवल तयार झाल्यावर पुढील वर्षी सर्व कापसावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्याचा मानस आहे.