कर्नाटक राज्यातील दुष्काळी भागात मी सरांच्या तंत्रज्ञानाचा दूत !

श्री. अशोक माणिकराव पांचाळ,
मु.पो. तोरणा, ता.औराद, जि. बिदर (कर्नाटक)
मोबा. ०७३५३४७९०६९


गेल्यावर्षी अॅग्रोवन कृषी प्रदर्शनातून (पुणे) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाल्यावर 'कृषी विज्ञान' मासिकाची वार्षिक वर्गणी भरली. अंक वेळेवर मिळत आहे. त्यातून माहिती बेस्ट मिळते. माझ्याकडे एकूण १२ एकर शेती आहे. त्यापैकी १० एकर कोरडवाहू शेती असून २ एकर बोअरवेळ बागायत आहे. कोरडवाहू १० एकरमध्ये सोयाबीन, हरबरा अशी पिके घेतो. बागायती २ एकरमध्ये 'सिद्धीविनायक' शेवगा १०' x ८' वर आणि ४ गुंठ्यात सुपर हैद्राबाद कंपनीचा टोमॅटो लावला आहे. माझा गेल्यावर्षी अपघातात एक पाय गेला. तरी स्वत:च्या देखरेखीखाली मजुरांकडून ही शेती करतोय.

दुष्काळात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दिला जीवनाधार !

जे.एस.३३५ सोयाबीन जुलै २०१४ मध्ये सुरूवातीचा उशीरा पाऊस झाल्यावर १० एकरमध्ये पेरले. याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या २० दिवसांच्या अंतराने सुरुवातीच्या २ फवारण्या केल्या. तर सुरूवातीचा पाऊस झाल्यानंतर पुन्हा पुर्णपणे दुष्काळ पडूनदेखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सोयाबीन चांगले वाढले. फुलकळी लागून ७० - ८० ते १०० शेंगा प्रत्येक झाडावर लागल्या.

आमच्या भागात बहुतांशी शेतकऱ्यांची पेरणी होऊ शकली नाही आणि ज्यांनी सोयाबीन पेरले ते फुलोऱ्यापुर्वींच पाण्याअभावी जळून गेले.

आमच्या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी सेंट्रल गव्हर्मेटची टीम शेतीची पाहणी करण्यासाठी आली होती. तेव्हा या टीमसोबत हॉर्टिकल्चरचे डायरेक्टर, अॅग्रीकल्चरचे डायरेक्टर होते. तेव्हा या डायरेक्टरांना मी अगोदरच सांगितले, कृपया ही टीम आमच्या गावात आणि विशेषत: माझ्या शेतीकडे आणू नका. कारण इतरत्र दुष्काळाने सर्वांची पिके गेली आहेत. माझे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सुदैवाने पीक चांगले आहे. जर केंद्र सरकारच्या टीमच्या पाहण्यात माझे प्लॉट आले तर तालुक्यातील दुष्काळाची खरी माहिती बाजूला राहून ते चुकीचा रिपोर्ट देतील आणि त्यावरून दुष्काळ जाहीर झाला नाही तर दुष्काळग्रस्त गरीब शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही. त्यांचे अतोनात नुकसान होईल.

मी भारत कृषक समाजाचा सभासद आहे आणि कर्नाटक राज्य रईत (शेतकरी) संघटनेचा तालुका बोर्डाचा मेंबर आहे. बलराम जाखड यांचे चिरंजीव भारत कृषक समाजाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी गन्नोर जि. सोनीपर (हरियाणा) येथे भारतातील सर्वात मोठ्या अधिवेशनाला बेंगलोर ते दिल्ली असे १०,८०० रू. चे माझे विमानाचे तिकीट काढून निमंत्रीत केले होते. कर्नाटकातील ५ जणांची यासाठी निवड केली होती, त्यामध्ये औराद तालुक्यातून मी एकटाच होतो.

दुष्काळात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या दोन फवारण्यात सोयाबीनचे पीक

सोयाबीनचे माझे पीक पाहण्यासाठी गावातील व शेजारच्या गावातीलही शेतकरी येत होते. एवढा उत्कृष्ट प्लॉट होता. खरेच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा रिझल्ट जबरदस्त आहे. मात्र त्यानंतर जवळपास १।। महिना पाऊस न झाल्याने नुसत्या २ फवारण्यावर सोयाबीनला खाली लागलेल्या १५ - २० शेंगा पोसल्या आहेत. मधल्या शेंगात हरबऱ्याच्या डाळीसारखे दाणे आहेत. तर शेंड्याला नुकत्याच शेंगा लागून त्यात मसुरीच्या डाळीसारखे दाणे आहेत. पीक वरून पुर्णपणे सुकले आहे. खालचा पाला वाळला आहे, यावर सरांनी सांगितले. 'जर ४०% ओल असेल तर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर ५०० मिली, थ्राईवर १ लि., क्रॉंपशाईनर १ लि., राईपनर ५०० मिली, न्युट्राटोन ५०० मिलीची २०० लि. पाण्यातून फवारणी केली तर मधल्या व शेंड्याच्यादेखील शेंगा चांगल्या पोसतील." मात्र माझ्या अंदाजानुसार पीक वाळून गेले आहे, ते शेवटच्या टप्प्यात आहे. १० ते १२ दिवसात काढावे लागेल.

मी सोयाबीनचे पहिले एकरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन काढले आहे. आता दुष्काळामुळे फक्त ५ - ६ क्विंटल उत्पादन मिळेल. इतरांना अर्धा क्विंटल देखील उत्पन्न मिळणार नाही अशी परिस्थिती आहे.

'सिद्धीविनायक' मोरिंगात सोयाबीनचे आंतरपीक

मी घोनशी, ता. जळकोट, जि.लातूर येथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या 'सिद्धीविनायक' शेवग्याचा प्लॉट पाहिला. तेव्हा त्याचा बहार संपत आला होता तरी शेंगांचे प्रमाण चांगले होते. म्हणून २ एकर 'सिद्धीविनायक' शेवगा जुलै २०१४ ला १०' x ८' वर लावला आहे. मधल्या १० फुटाच्या पट्ट्यात सोयाबीन पीक घेतले आहे आणि ओळीतील ८ फुटाच्या अंतरामध्ये ४ - ४ फुटावर साधारण प्रत्येकी २५ ते ३० गुंठे वांगी, टोमॅटो, मिरची यांचे आंतरपीक घेतले आहे. शेवग्याला आतापर्यंत ४ फवारण्या झाल्या आहेत. झाडे ३ फूट उंचीची आसू फुलकळी लागण्यास सुरुवात झाली आहे. तर आंतरपिकांवर देखील हीच फवारणी केल्याने झाडांची वाढ निरोगी असून फूट चांगली आहे. त्यांनाही फुलकळी लागून लहान - लहान फळे लागली आहेत.

४ गुंठ्यात रोज ४ ते ५ क्रेट टोमॅटो

दुसऱ्या ४ गुंठ्यामध्ये जुलै महिन्यातच हैद्राबादच्या सुपर व्हरायटीचा टोमेटो लावला आहे. त्याला एकूण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ४ फवारण्या केल्या आहेत. सध्या उत्पादन चालू आहे.

तर दररोज ४ ते ५ क्रेट (८० ते १०० किलो) टोमॅटो निघत आहे. मी पायाने अपंग असल्याने बागवानाला उक्ताच प्लॉट २२ हजार रू. ला दिला. तो जागेवरून माल घेऊन गावात किरकोळ २० रू./किलो भावाने विकतो आणि जास्तीचा माल उदगीर मार्केटला २०० ते ३०० रू./क्रेट भावाने विकतो.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्यांचा फरक मला प्रकर्षाने जाणवला. टोमॅटो फळ वजनदार, मोठे असून फळावर आकर्षक चमक येत असल्याने बाजारात १० ते २० रू./क्रेटला भाव जादा (बागवानाला) मिळत आहे.

मी कलकत्ता झेंडू २० - २५ गुंठे दरवर्षी लावतो. मागे २ एकर झेंडू लावला होता. तेव्हा उत्पादन जादा झाल्याने गावात गाडीभर मालाला फक्त २० हजार रू. देत होते म्हणून हैद्राबादला पाठविला, मात्र तेथे आवक जादा झाल्याने गाडीभर मालाचा खर्च जाऊन फक्त ५ हजार रू. राहिले, तेव्हापासून मोठ्या क्षेत्रावर झेंडू न लावता दरवर्षी साधारण अर्धा एकरच लावतो. यावर्षी झेंडूवरही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या तीन फवारण्या केल्या आहेत, तर सध्या झेंडू माल चालू असून ४० ते ६० रू. दर मिळत आहे.

माझी सरांना विनंती आहे की, मी भारत कृषक समाजाचा सभासद असल्याने आमच्या भागात मोठा शेतकरी मेळावा आयोजित करणार आहे. तेव्हा तुम्ही आमच्या भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यावे. मला आपले तंत्रज्ञानाच्या रूपाने एक संधी मिळाली आहे. त्याचे मी सोनंच करणार आहे.