दुष्काळी परिस्थितीतही १ एकर कपाशीचे ११ क्विंटल उत्पादन

श्री. हनुमान सुदामराव उगले, मु.पो. हिवरा (गो.), ता. परळी वैजनाथ, जि. बीड-४३११२८. मो. ७८७५९०७७४१

डिसेंबर २०१३ मध्ये किसान प्रदर्शन पाहण्यास आलो होतो. तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाली. त्यावरून गेल्यावर्षी खरबुजासाठी हे तंत्रज्ञान वापरायचे ठरविले. गेल्यावर्षी खरबुजासाठी डिसेंबर (२०१४) अखेरीस १ एकर कुंदन खरबुजाची लागवड भारी काळ्या जमिनीत ८ x १।। फुटावर केली होती. या खरबुजासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी सप्तामृत औषधांची फोनवरून माहिती घेऊन त्यानुसार बँकेमध्ये पैसे भरून पुण्याहून एस. टी. पार्सलने औषधे मागवून घेतली. शिफारशीप्रमाणे १५ - १५ दिवसांच्या अंतराने जानेवारी २०१५ पर्यंत २ फवारण्या केल्या. कमी पाण्यावर प्लॉट एक नंबर आला होता. रोग - कीड अजिबात नव्हती. थंडी असूनही वेलांची वाढ चांगली झाली. फुलकळी लागून फळधारणाही चांगल्याप्रकारे म्हणजे वेलीवर ३ - ४ फळे लागली होती, मात्र फेब्रुवारीमध्ये पाणी फारच कमी म्हणजे बंदच झाल्याने कवठाच्या आकाराची फळे असताना वेल सुकू लागले. तरीही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची जानेवारी अखेरीस तिसरी फवारणी केल्यामुळे वेल सुकले असतानाही काही प्रमाणात फळांचे पोषण होऊन १० -१२ हजार रू. ची फळे विकली, त्यामुळे किमान बियाणे आणि औषधांचा खर्च तरी निघाला.

या अनुभवातून चालूवर्षी १ एकर कपाशीला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरली. ७ जून २०१५ ला भारी काळ्या जमिनीत ६' x १।।' वर कपाशी लावली आहे. मात्र यावर्षी पावसाने खुपच ताण दिल्याने कपाशीची वाढ खुंटली. उत्पादनाची शाश्वती नसल्याने ठिबकवर ३ फुटावरून कपाशीच्या दोन्ही ओळीमधून नागपंचमीला झेंडू आणि ऑगस्ट अखेरीस गावरान काकडी लावली. या तिन्ही पिकांसाठी पुण्याहून एस. टी. पार्सलने सप्तामृत औषधे मागवून घेतली. त्याच्या कपाशीवर ४ फवारण्या केल्या, तर झाडांची खुंटलेली वाढ सुरू होऊन झाडावर ५० ते ६० बोंडे लागली होती. या कापसाची सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पहिली वेचणीकेली तर ५ क्विंटल. आठवड्यात केली तर ३ क्विंटल. कापूस मिळाला. आता गेल्या आठवड्यात (ऑक्टोबरच्या पहिल्या) सप्तामृताची फवारणी केली आहे. त्याने अजून फुलपात्या लागल्या आहेत. मात्र सध्या नवीन फुटीवर पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव झाला आहे. म्हणून पुणे ऑफिसला (१४ ऑक्टोबर २०१५) फोन करून फवारणी संदर्भात माहिती घेतली. त्यानुसार पाती गळ होऊ नये, बोडांचे पोषण व्हावे, पिठ्या ढेकूण आटोक्यात येण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन, राईपनर, प्रोटेक्टंट, हार्मोनी आणि स्प्लेंडर फवारणार आहे.

सध्या लागलेल्या बोंडावरून अजून ३।। क्विंटल कापूस उत्पादन मिळेल. म्हणजे दुष्काळी परिस्थितीत १ बॅग बियापासून ११ क्विंटल उत्पादन हे आमच्या भागात १ नंबरचे उत्पादन आहे. आमच्या शेजारच्या शेतकऱ्याला ५ क्विंटल देखील उतारा मिळाला नाही. या कापसात लावलेला झेंडू देखील अतिशय चांगला आला आहे. याला आतापर्यंत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ३ फवारण्या केल्या आहेत. फुलकळी व फुले भरपूर आहेत. आज १४ ऑक्टोबरला फुले तोडणीयोग्य तयार आहेत. मात्र आमच्या भागात दसरा - दिवाळीशिवाय फुले कोणी घेत नाही त्यामुळे एरवी भाव नसतात. म्हणून आता दसऱ्याला तोडणी करणार आहे. या कापसातील काकडीचा १ तोडा झाला आहे, तर ३ क्विं. माल निघाला. काकडी २० रू. किलोने विकली. पुढील तोड्याला अजून माल वाढेल. साधारण ५ क्विं. चे ७ - ८ तोडे सहज निघतील असा काकडीचा प्लॉट आहे. गावरान काकडी असल्याने तिसऱ्या दिवशी तोडा करतो.

Related New Articles
more...