२० गुंठे कलिंगडापासून निव्वळ नफा १ लाख २० हजार

श्री. शशिकांत निवृत्ती माने,
मु.पो. नेवरे, ता. माळशिरस, जि. सोलापूर
मो. ९४०३०४७५६४शुगर क्विन कलिंगडची ३००० रोपे १५ ऑगस्ट २०१५ ला २० गुंठ्यामध्ये मल्चिंगवर लावली होती. १२ दिवसांची तयार रोपे २.८५ रू. प्रमाणे आणली होती. मल्चिंग करतेवेळी १८:४६ ची १ बॅग, निंबोळी १ बॅग, बोरॅकॉल १० किलो, पोटॅश ५० किलो, सुपर गोळी खत ५० किलो, कल्पतरू सेंद्रिय खत ५० किलो असा एकत्र डोस देऊन मल्चिंग केले.

४ फुट रुंद मल्चिंग पेपरची ओळ असून मध्ये २ फुटाची रिकामी जागा असे लागवडीतील ओळीत ६ फुट अंतर होते व ओळीमध्ये १। (सव्वा) फुटावर होल पाडून इनलाईन ठिबकने प्रथम पाणी देऊन बेड ओले केले. रोपे ट्रे मध्ये होती. ट्रेमधील रोप अलगत काढून १० लि. पाण्यात १०० मिली जर्मिनेटर अशा प्रमाणात घेऊन या द्रावणात रोपे बुडवून लावली. त्यामुळे पांढरी मुळी चांगली वाढली. ९०-९५% रोपे चांगली फुटून आली.

१५ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी २५० मिली, प्रोटेक्टंट २५० ग्रॅमची १०० लि. पाण्यातून फवारणी केली. पुन्हा वेळापत्रकानुसार दर १५ दिवसाला अशा एकूण ४ फवारण्या केल्या.

वेलीवर ३ - ४ फळे होती. फळाचे वजन चांगले वाढले. लागवडीनंतर २ महिन्यात फाढणी केली तर २० गुंठ्यातून १८ टन फळे मिळाली. फळाचे वजन १।। किलो पासून ८ किलोपर्यंत होते. सरासरी ३।। ते ४।। किलोची जास्त फळे मिळाली.

पुण्यामध्ये १५ ऑक्टोबर २०१५ ला खेडकर यांच्या गाळ्यावर ८ टन कलिंगड विक्री केले तर ८ ते १० रू. किलोने ७२ हजार रू. ची पट्टी झाली आणि आज (१६ ऑक्टोबर २०१५) १० टन माल आणला होता. त्याचे ८० हजार रू. झाले. असे एकूण १ लाख ५२ हजार रू. झाले.

या कलिंगडाला मल्चिंगचा ५ हजार रू., रोपांचा ८५०० रू., रासायनिक खताचा ७००० रू., डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा २५०० रू., कल्पतरू खत ७०० रू., आलटून पालटून बुरशीनाशके, किटकनाशके फवारली होती त्याचा ३।। हजार रू. आणि मजूरी ५००० रू. असा एकूण ३२ हजार रू. खर्च आला. असे खर्च वजा जाता १ लाख २० हजार रू. नफा २ महिन्यात मिळाला. या मल्चिंगवर अजून २ पिके निघतात.

वेलवर्गीय पिके ही रोग किडीस लवकर बळी पडतात. याला जर सतत रासायनिक औषधे वापरली तर रोग किडी लवकर आटोक्यात येत नाहीत. त्यामुळे पिकाची वाढ होत नाही. फळे पोसत नाहीत. यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वेळापत्रकाप्रमाणे फवारले असता रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे पीक रोगाला फारसे बळी पडत नाही. रोगाचा प्रादुर्भाव झालेला असला तरी तो लवकर आटोक्यात येतो. त्यामुळे वेलांची वाढ चालू राहते. जर्मिनेटरच्या ड्रेंचिंगमुळे पांढरी मुळी वाढते व शेंडा चालतो तसेच नियमित डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फवारल्यामुळे फळांचे पोषण चांगले होऊन फळाला कलर येतो. गोडी वाढते, फळ फोडले असता आतून लालभडक, मधूर गोड, गर असतो, त्यामुळे भावही जादा मिळतो.

ह्या कलिंगडाचे वेल काढून आता जिप्सी काकडी त्याच मल्चिंगवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने घेणार आहे. याची लागवड २५ ऑक्टोबरला होईल.