अति पावसातही माझी हळद निरोगी पाचूसारखी हिरवीगार, इतरांची पिवळी पडून निस्तेज

श्री. प्रविण उत्तमराव सुरोशे, मु.पो. शिंदगी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ - ४४५२०६.


माझ्याकडे २४ एकर जमीन आहे. त्यामध्ये मी पारंपारिक पद्धतीने पिके घेत होते. यावर्षी त्यातील २ एकर क्षेत्रामध्ये हळद लागवड करण्याचे ठरविले. मात्र मला हळद पिकाबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे तेव्हा आमच्या येथील सहारा कृषी केंद्र, ब्राम्हणगाव यांना याबद्दल विचारले असता त्यांनी आपल्या भागातील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी सतिश धवणे यांना भेटण्यास सांगितले व त्यांनी मला त्यांचा मोबाईल नंबर (९४२३६६२६५१) दिला. मी संपर्क केल्यानंतर प्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतात येऊन भेट दिली व हळद पिकाविषयी मार्गदर्शन केले.

प्रथम शेतामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट एकरी ३ बॅगा टाकून ४ फुटावर बेड तयार केले आणि लागवडीच्या वेळी एकरी २ पोते कल्पतरू खत व १ पोटे डी. ए. पी. खत बेडवर दिले. त्यानंतर जर्मिनेटर ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली + क्लोरोपायरीफॉसचे २० लि. पाण्यात द्रावण तयार करून हळदीचे बेण्यास बीजप्रक्रिया करून १ - १ फुटावर (४' x १') लागवड केली. त्यामुळे उगवण लवकर झाली. आमच्या शेजाऱ्यांपेक्षा ५ दिवस उशीरा हळद लागवड करून सुद्धा लवकर निघाली/ उगवली. जर्मिनेटरची बिजप्रक्रिया केल्यामुळे पांढऱ्या मुळ्या भरपूर प्रमाणात निघाल्या. कल्पतरूमुळे जमीन भुसभुशीत राहिल्यामुळे रोपांची वाढ निरोगी व हिरवीगार दिसत होती. लागवडीनंतर ३० दिवसांनी ५०० मिली जर्मिनेटर + ५०० मिली थ्राईवर + ५०० मिली क्रॉपशाईनर + २५० मिली हॉर्मोन + ५०० ग्रॅम प्रोटेक्टंटची १५० लि. पाण्यातून फवारणी केली असता हळदीच्या पानांची रुंदी वाढून चकाकी व टवटवीतपणा दिसू लागला. तसेच करपा, टिक्का या रोगास प्रतिबंध झाला. यामुळे आजुबाजुचे लोक म्हणत "तुम्ही काय फवारले? आम्हाला पण सांगा." त्यानंतर १ - १ महिन्याच्या अंतराने अशा सप्तामृताच्या एकूण ३ फवारण्या सप्टेंबर अखेरपर्यंत झाल्या आहेत. सध्या माझ्या हळदीची जवळपास ३।। फुटापर्यंत वाढ झालेली आहे. आता ३ महिन्यानंतर एकरी १०:२६:२६ खताची १ बॅग व कल्पतरू खताच्या २ बॅगा देऊन हळदीला भर दिली आहे. त्यामुळे फुटवे जास्त प्रमाणात म्हणजे ५ - ६ फुटवे दिसत आहेत. तसेच नविन गड्डे तयार होत आहेत. आतापर्यंत माझ्या शेतातील हळदीवर करप्याचा डागसुद्धा दिसत नाही. यावर्षी पावसाळ्यात वरचेवर सतत पाऊस झाल्याने अति पाण्याने इतरत्र हळद पिकावर पाने पिवळी पडून करप्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. त्यामुळे हळदीचे गड्डे पोषणासाठी पुढेही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे.