इंटरनेटवरील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची वेबसाईट माझी गुरु, २।। एकर हरभरा १५ क्विंटल, दर ५,७०० रु./क्विंटल एकूण ८५,५०० रु. उत्पन्न

श्री. विनोद विठ्ठलराव जाधव,
मु.पो. छत्रबोरगाव, ता. माजलगाव, जि. बीड - ४३११३१.
मो. ९४०४३१९०६०


गेल्यावर्षी मी माझ्या २।। एकर शेतामध्ये हरभरा हे पीक घेतले होते. अगोदरचे सोयाबीनचे शेत असल्यामुळे जमिनीमध्ये पेरणी करिता ओल नव्हती. त्यामुळे जमीन पुर्ण भुईदांडाने भिजवली व त्यामध्ये महामंडळाच्या जकी या बियाणाची पेरणी करण्याचे ठरविले.

सुरुवातीला पेरणीच्या वेळेस एकरी १ पोते १२:३२:१६ हे खत सर्वत्र फेकून दिले. त्यानंतर शेत वाफस्यावर आल्यावर १८ इंची तिफणीने (२ ओळीतील अंतर १८ इंच) पेरणी केली. यासाठी मला एकरी २५ किलो बी लागले. उगवण क्षमता चांगली झाली. त्यानंतर १ महिन्याने भुईदांडाने (पाटाने) पाणी सोडले. जमीन भारी असल्यामुळे वाफसा लवकर आला नाही. परिणामी पीक पिवळे पडले. त्यावर बुरशीनाशके फवारली. बरेच दिसत वाट पाहिली, पण पिवळेपण काही कमी होईना. परिणामी हरभऱ्याची पालझड (पानगळ) होऊन पीक पुर्णपणे जाण्याची भिती वाटू लागली. इंटरनेटवर बटाटा पिकाची माहिती शोधत असताना मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे नाव दिसले. त्याद्वारे अधिक माहिती शेधताना विविध शेतकऱ्यांचे अनुभव, पत्ते व मोबाईल नंबर मिळाले. मग मी त्यातील एका (मुरूम) येथील शेतकऱ्याला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीबद्दल विचारले. तेव्हा त्यांनी ही टेक्नॉलॉजी अतिशय चांगली आहे आणि त्यांच्या फवारण्यांमुळे पिकाचे हमखास उत्पादन मिळते, असा त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला. मग मी माझ्या हरभरा पिकावर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधाची फवारणी केली. तर ३ दिवसात (७२ तासात) हरभरा हिरवा झाल्याचे दिसले. नवीन फुट निघू लागली. मग फुलकळी लागल्यानंतर ती गळू नये म्हणून आणि घाटे पोसण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची दुसरी फवारणी केली. तर गेल्यावर्षी थंडी कमी असताना देखील या दोन फवारण्यांवर १५ क्विंटल हरभरा २।। एकरमध्ये झाला. तो माजलगाव मार्केटला ५७०० रु./क्विंटल भावाने विकला.