व्हायरसने ग्रासलेला (वेढलेला) २ एकर पपई प्लॉट रोगमुक्त ३० टन, दर १५ ते २२ रु./किलो, खर्च १।। लाख, उत्पन्न ५ लाख, अजून १५ ते २० टन अपेक्षीत

श्री. अशपाक प्यारूसाहेब पाटील,
मु.पो.औंज (म.), जि. सोलापूर.
मो. ९७३०९७११८४/९७३०४६२७७६


मी अशपाक पाटील मुळचा मंगळवेढ्याचा. पण तेथे पाणी कमी असल्याने शेती व्यवसाय अडचणीमध्ये आहे. त्यामुळे आम्ही सर्व परिवारासह मामाच्या गावी म्हणजे औंज (म.), ता. दक्षिण सोलापूर येथे आलो. त्याठिकाणी आम्ही मामाच्या शेतामध्ये बटाईने म्हणजे वाट्याने शेती करण्याचा निर्णय घेतला आणि २ एकर पपई लागवड करण्याचे ठरविले.

आम्ही ८ ऑक्टॉबर २०१५ रोजी २ एकरमध्ये पपईची लागवड केली. आम्हाला २००० रोपे लागली. खुप अडचणीमधून हा निर्णय घेतला होता. लागवड ७' x ६' वर आहे. वाण - तैवान ७८६ निवडला. मात्र लागवडीपासून ३ महिन्यामध्येच आमचा प्लॉट हा पुर्ण व्हायरस रोगाने वेढला. आम्ही औंज भागातील बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्लॉट दाखविला. मात्र रोगाचा प्रादुर्भाव फारच असल्याने त्यांनी आम्हाला हा प्लॉट काढून टाकण्याच्या सल्ला दिला. त्यावेळी खूप दु:खी झालो. योगायोगाने इंटरनेटवर माहिती सर्च करत असताना डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची माहिती मिळाली. त्यानंतर पुणे ऑफिसला फोन केला असता आमच्या भागातील कंपनी प्रतिनिधी नागेश पाटील यांची माहिती मिळाली. त्यानंतर नागेश पाटील (मो.९६८९५०९९७६) यांच्याशी संपर्क साधून त्यांना प्लॉटवर बोलावून मार्गदर्शन घेतले. त्यांनी मला हा प्लॉट न काढण्याचा सल्ला दिला व डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने पपई व्हायरस मुक्त करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ असा आशावाद व्यक्त केला.

त्यानंतर व्हायरस नियंत्रणासाठी नागेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ८ - ८ दिवसांनी थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन, हार्मोनीच्या २ फवारण्या केल्या आणि जर्मिनेटरचे ड्रेंचिंग केले. एवढ्यावर १५ - २० दिवसात पुर्ण व्हायरसमुक्त बाग झाली. त्यानंतर गरजेप्रमाणे १५ दिवस ते १ महिन्याच्या अंतराने नियमित डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या आजतागायत चालू आहेत.

जून २०१६ मध्ये पपईचे तोडे चालू झाले. आठवड्याला २।। ते ३ टन माल निघत होता. सुरुवातीला पाऊस नसल्याने उष्णता अधिक होती. त्यामुळे फळे लवकर पोसत होती. २।। - ३ महिने याप्रमाणे उत्पादन मिळत गेले. नियमित डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या घेत असल्यामुळे मालाचा दर्जा वाढला. आकर्षक कलर व एकसारखी फुगवण यामुळे मुंबईचे व्यापारी जागेवरून १८-२०-२२ रु./किलो भावाने पपई घेत असे. ५ ऑक्टोबर २०१६ पर्यंत ३० टन माल निघाला आहे. गेल्या आठवड्यापासून दररोज परतीचा पाऊस (अतीवृष्टी) पडत असल्याने माल कमी झाला आहे. मात्र अशाही परिस्थितीत बाग डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नियमित फवारण्यांमुळे सुस्थितीत आहे. सध्या भाव १५ - १६ रु./किलो मिळत आहे. अजून ३ महिने पपई चालेल. तेव्हा अजून किमान १५ ते २० टन उत्पादन सहज मिळेल.

आमच्या बागेच्यासोबत परिसरात जवळपस २० एकर पपई लागवड झाली होती. मात्र आपल्या बागेतील झाडांवर लागलेला माल पाहता तसा इतरांच्या कोणाच्याच बागेवर दिसत नाही, असे व्यापाऱ्यांचे देखील म्हणणे आहे. विशेष म्हणजे व्हायसर रोगाच्या अती प्रादुर्भावाने प्लॉट काढण्याची वेळ माझ्यावर आली होती, मात्र अशा परिस्थितीतून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने नुसता प्लॉट वाचला नाही तर दर्जेदार माल निघून भावही १८ ते २२ रु./किलो मिळाल्याने आम्हाला ५ लाख रु. उत्पन्न मिळाले असून अजून ३ महिने फळांचे तोडे चालतील. या प्लॉटला एकूण खर्च १।। लाख रु. आला आहे.