डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने कपाशी ४ फुटापेक्षा अधिक उंच, निरोगी, सुद्दढ मालाने लगडली

श्री. संकेत आबासाहेब बोबडे, मु.पो. तिर्थपुरी, ता. घनसावंगी, जि. जालना- ४३१२०४.
मो. ७५०७२००९३४


आम्ही तिर्थपुरी मार्केटमध्ये मागील वर्षीपासून एकच चर्चा ऐकत होतो की, कापसावर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे जर्मिनेटर आणि कॉटन थ्राईवर ही फारच जबरद्स्त औषधे आहेत. म्हणून मी समर्थ अग्रो ह्या आपल्या डिलरकडे गेलो असता तेथून मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिघी श्री. गणेश कसाब (मो. ७७९८६१०६५०) यांचे सविस्तर मार्गदर्शन घेतले. त्यांनी माझ्या १ हेक्टर कपाशीच्या प्लॉटवर ५ - ६ वेळा भेटी दिल्या. त्यांचे अभ्यासपुर्ण मार्गदर्शनातून माझी कपाशी आज ४ फुटापेक्षा अधिक उंच व मालाने लगडून गेली आहे.

खर तर ठिकाणी मी कापशी लावली. तिथे ज्वारी पण येत नव्हती. परंतु कसाब यांची कल्पतरू सेंद्रिय खतच्या वापरा संबंधी सांगितले. या कल्पतरू सेंद्रिय खताच्या वापरामुळे माझ्या जमीन सुधारणेत खुप मोठा फायदा झाला. नंतर त्यांनी मला जर्मिनेटरची आळवणी करण्यास सांगितले. त्या आळवणीचा माझ्या कपाशीच्या वाढीसाठी मुख्यत्वे फायदा झाला.

त्यानंतर प्रत्येक फवारणीच्या अगोदर मी श्री कसाब यांनी संपर्क करून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांची वेळच्या वेळी फवारणी करीत होतो. तर मला माझ्या निरोगी, सुद्दढ कापशीतून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.

कॉटन थ्राईवरच्या वापरामुळे माझा कपाशी प्लॉट अत्यंत हिरवा व भरघोस भरभरून गेला आहे आणि हेच आमच्या भागात जर्मिनेटर व कॉटन थ्राईवर तसेच कल्पतरू खताच्या चर्चेचे कारण बनले आहे असे जाणवले.