तूर १६ गुंठे, ८ क्विंटल दर्जेदार उत्पादन, बियाण्यासाठी ८० रु. किलोने विक्री

श्री. गणेश परमेश्वर कोल्हे,
मु.पो. कासापुरी, ता. पाथरी, जि. परभणी.
मो. ९४०५३९१००३


आम्ही जून २०१६ मध्ये तूर लागवडीसाठी कोणते बियाणे घ्यावे यासाठी श्री. अशोक काटे यांना फोने केला असता त्यांनी आम्हास बी.डी.एन.-७११ ह्या वाणाची शिफारस केली होती. त्याप्रमाणे आम्ही त्याची जून २०१६ च्या पावसावर ५ x १.५ फुट अंतरावर केवळ १६ गुंठ्यामध्ये लागवड केली होती. उगवून आल्यावर २२ दिवसांनी आम्ही जर्मिनेटर, प्रिझम, थ्राईवर ह्या औषधांचा एक स्प्रे घेतला. त्यातून आम्हाला इतर क्षेत्रातील तुरीपेक्षा वाढ जास्त जाणवली. नंतर आम्ही कीड नियंत्रणासाठी सल्ल्याप्रमाणे क्लोरपायरीफॉसची फवारणी घेतली. काही दिवसांनी परत सप्तामृताचा स्प्रे घेतला. हा आमचा पहिला प्रयोग होता. परंतु जसे पीक फ्लावारींगमध्ये आले तसा चमत्कार दिसला. तूर एवढी बहरली की शेजारी लोक अचंबा करत होते व काय वापरले असे विचारात होते.

आम्हाला केवळ १६ गुंठे क्षेत्रातून ८ क्विंटल तूर झाली होती. आमही कोटेंच्या मार्गदर्शनानुसार या तुरीची चांगली मार्केटींग केली व सुमारे ८० रु. किलोने सर्व बियाणे म्हणूनच ही तूर विकली, तर ६४,००० रु. रोख मिळाले. म्हणूनच आम्ही नोव्हेंबर २०१६ मधील केळी लागवडीस डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर निश्चित केला व त्याचा अनुभवही चांगला आला.

२९ ते ३५ किलोचे केळीचे घड

आम्ही दि. १० नोव्हेंबर २०१६ रोजी केळी लागवड केली. लागवड करताच आम्ही जर्मिनेटरची आळवणी केली. काही दिवस हुमणीचा त्रास झाला, परंतु पांढऱ्या मुळांची संख्या जर्मिनेटरमुळे प्रचंड वाढली. नंतर काटे साहेंबांची भेट झाली. त्यांच्या मार्गदर्शनातून सुरुवातीस डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे जर्मिनेटर ४० मिली + थ्राईवर ४० मिली + हार्मोनी २० मिली + प्रोटेक्टंट २० ग्रॅम/पंपास घेऊन फवारणी केली.

त्याने वाढ झपाट्याने होवू लागली. वेळोवेळी खताच्या वापराबद्दल सल्ला मिळाला. त्यानंतर काटे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी एकूण सप्तामृताच्या ५ फवारण्या पीक निघेपर्यंत केल्या. तसेच दर महिन्यास १ ते १।। लि. जर्मिनेटरचे ड्रेंचिंग केले. त्यामुळे झाडांच्या वाढीबरोबर कमळ लवकर निघून सर्व झाडांवरून घड बाहेर पडले. तसेच पुढे घड पोसण्यासाठी वरील फवारण्यांमध्ये राईपनर, न्युट्राटोनचा वापर केल्याने घडांचे पोषण अधिक प्रमाणात झाले. आज दि. २०/०९/२०१७ रोजी प्रत्येक्ष डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी हे केळी उतरताना हजर होते. त्यांच्या समक्ष आम्ही सुमारे २५० झाडांवरील घडांचे वजन केले असता २९ ते ३५ किलो पर्यंत वजन भरत होते. ही सारी किमया डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या सप्तामृताची ५ वेळा फवारणी तसेच जर्मिनेटर प्रति महिना केलेली आळवणी याचीच आहे.