हार्मोनीच्या दोन स्प्रेमध्ये डावण्या कंट्रोल

श्री. अनिल पांडुरंग शिंदे,
मु. विजयनगर, पो. म्हैसाळ, ता. मिरज, जि. सांगली.
मोबा. ९९२३५४४६७४


क्षेत्र - ६ एकर,
जात - थॉमसन, माणिक चमन

छाटणी तारीख - २४ सप्टेंबर २०१०

चालू वर्षी वातावरण खूप खराब होते. नेहमी ढगाळ वातावरण व अधुन - मधून पाऊस पडत होता. अशा वातावरणामध्ये बाग वाचवण्यासाठी महागडी केमिकल्स (रासायनिक औषधे) फवारणी लागत होती. ७ ते ८ दिवसाचे अंतराने वापरावयाची औषधे २ ते ३ दिवसांचे अंतराने वापरून देखील डावणी कंट्रोमध्ये येत नव्हता. डावणीने बागेचे ३० ते ४० % नुकसान झाले होते. त्यामुळे इतर सेंद्रिय औषधांचे वापर करणे गरजेचे होते. त्यामुळे आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे 'हार्मोनी' ह्या औषधाचा स्प्रे. घेतला. पहिल्याच स्प्रेमुळे चांगला रिझल्ट मिळाला. बागेतील पानांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. त्यानंतर सात दिवसाचे अंतराने दुसरा स्प्रे घेतला. त्यामुळे डावणीपासून चांगले संरक्षण मिळाले. तसेच घडावरील डावणी, आटोक्यात आली. हार्मोनीमुळे महागड्या औषधांचा खर्च कमी झाला. खरोखरच हार्मोनीचे स्प्रे फायद्याचे आहेत.