छाटणीपासून हार्मोनीचा वापर म्हणजे डावणीला रामराम, कमी खर्चात चांगले उत्पन्न

श्री. प्रकाश शंकर जाधव,
मु. पो. सिद्धेवाडी, ता. तासगाव, जि. सांगली.
मोबा. ९८२३९४०७७८


क्षेत्र - २ एकर, जात - सोनाका,

छाटणी तारीख - २१ सप्टेंबर २०१०

माझ्या बागेमध्ये डावणीसाठी हार्मोनी हे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी (अॅग्रो) प्रा. लि. पुणे यांचे औषध छाटणीच्या सुरूवातीच्या दिवसापासून वापरले आहे.

त्यामुळे माझ्या बागेत डावणी कसलाच आलेला नाही. मी डिपींगमध्ये सुद्धा हार्मोनी हे २ मिलीने वापरले आहे. त्यामुळे घडावर डावणी नाही.

त्याचबरोबर घडावरती चकाकी व काळोखी दिसून येत आहे. त्याचबरोबर हार्मोनीमुळे वर्षेभरामध्ये डावणीवरील महागड्या रासायनिक औषधांच्या खर्चात बऱ्याच प्रमाणात बचत झालेली आहे.

माझ्यामते शेतकऱ्यांनी इतर महागडी औषधे फवारण्यापेक्षा हार्मोनी हे स्वस्तातले, खात्रीचे औषध म्हणून वापरावे.