खराब पाणी तरीही २२ हजार रू. चा कापूस सुतगिरणीतील स्टाफ विचारतो एवढा चांगला कापूस कसा ?

श्री. भगवान प्रभाकर देशपांडे

४७८२/७ मार्केट यार्ड, पंढरपूर, सोलापूर

आम्ही किसान प्रदर्शन २००२ साली पाहण्यास आलो तेव्हा सरांची भेट झाली. तेव्हापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करू लागलो. पुर्वी शेती मोहोळला होती. परंतु तिथे पाणी फार खराब असल्यामुळे कोणतीच पिके व्यवस्थित येत नव्हती. पण आम्ही कापूस केला होता. त्याला फक्त सप्तामृत व कल्पतरू वापरले होते. तर त्याकाळी २२ हजार रू. चा कापूस निघाला होता. आम्हाला सांगोल्याचे वसंत सुतगिरणीचे लोक विचारायचे अजून कापूस आहे का ? कारण कापूस खूपच पांढराशुभ्र लांब धाग्याचा स्वच्छ होता. कवडी अजिबात नव्हती.

भगव्याचे बागेस चमक !

पुढे आम्ही ती शेती खराब पाण्यामुळे विकून मोहोळमध्ये ४ एकर नवीन जमीन घेतली. त्या १० x १२ ' वर भगवा डाळींब लावले आहे. त्याला सुरूवातीपासून आपले तंत्रज्ञान वापरत आहे. बागेचे पाणी १० जुने २०११ ला तोडले. त्यानंतर बहार धरल्यापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घेत आहे. शेजारी इतर शेतकरी विचारतात की, तुमच्या बागेला एवढी चमक कशी काय तेव्हा मी त्यांना सांगतो. या बागेस डॉ.बावसकर सरांचे तंत्रज्ञान वापरले आहे. सरांची भेट घेण्याची माझी इच्छा २००२ पासून होती ती आज पुर्ण झाली.

Related New Articles
more...