विदर्भातील गुलाब, झेंडू, अॅस्टपासून एकरी ५० ते ६० हजार रू.

श्री. विष्णू धर्मुजी सिंगरे, ६५३, मरारटोली, रामनगर, नागपूर, - ४४००३३.
मोबा. ९९७५७३५४८४


आम्ही कृषी विज्ञान मासिकाचे ५ - ६ वर्षापासून वर्गणीदार असून नियमीत वाचन करतो. त्यानुसार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी (सप्तामृत औषधे) आम्ही करत असलेल्या झेंडू, अॅस्टर, गुलाब या फुलशेतीला वापरत असतो. गेल्या ५ - ६ वर्षापासून प्रतिकुल परिस्थितीतही या तंत्रज्ञानामुळे आम्ही यशस्वीरित्या उत्पादन घेतो. दरवर्षी झेंडू आणि अॅस्टर गणपतीत चालू होईल या हिशोबाने जून - जुलैमध्ये लागवड करत असतो. गावठी गुलाब ३ वर्षापुर्वी लावलेला ३ x ३ फुटावर ३०० झाडे आहेत. आमच्या येथे गुलाबाची फुले शेवंती, झेंडूप्रमाणे तोडली जातात. काडी अजिबात नसते. मुस्लिम समाजाला असली फुले लागतात. दररोज ८ ते १० किलो फुले निघतात. नागपूर मार्केटला २० रू. पासून ७० रू. किलो पर्यंत बाजार मिळतो. सप्तामृत फवारण्यामुळे फुलांना शाईनिंग जबरदस्त येथे त्यांचा टिकाऊपणा वाढतो. झाडाची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. एकरी १० ते १५ हजार रुपये खर्च करून गुलाब, झेंडू, अॅस्टरपासून एकरी ५० ते ६० हजार रू. मिळतात.