७ एकर पॉलिहाऊस गुलाबासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी यशस्वी

बडवे इंजीनिअरिंग (नर्सरी)
श्री. अजय गुलाबराव पाटील (सुपर वायझर)
आंबी एम. आय. डी. सी. प्लॉट नं. १०, तळेगाव, ता. मावळ, जि. पुणे.
मोबा. ९८८११५०७८५


आमच्या कंपनीचे ७ एकर पॉलीहाऊस आहे. त्यामध्ये गोल्ड स्टाईक, पॉयझन, अॅव्हीलेंच, बोर्डो, रिवायबल, अप्पर क्लास सामोराई या वाणांचा गुलाब आहे. बेड १ मीटर रुंदीचे, ९" उंचीचे व लांबी ३०० ते ५०० फुट जागेनुसार आहेत. बेडवर २ लाईन गुलाबाच्या आहेत. दोन्ही ओळीत ८ सेमी व २ झाडांत १७ सेमी अंतर आहे. पाणी व्यवस्थापनासाठी ड्रीप केले आहे.

लागवडीनंतर 3 महिन्यात उत्पदान चालू होते. ५ वर्षापर्यंत उत्पादन मिळते. तोडा दररोज करतो. आवश्यकतेनुसार ८ दिवसाला कधी १५ दिवसाला फक्त जर्मिनेटची १ मिली/ लि. या प्रमाणे फवारणी करतो. त्याने फुटवा लवकर होतो. स्टेमची जाडी वाढते. (थिकनेस वाढतो) नवीन फुटवा निघतानाच स्टाँग (जाड काडीचा) निघतो. त्यामुळे काढणीनंतर ७ ते ८ दिवस फुले आहे तशी राहतात.

दररोज १५०० ते २००० फुले एकरी मिळतात. जागेवरून २० फुलांचा बंच सरासरी ४० रू. प्रमाणे जातो. काही माले पुणे मार्केट ला विकतो. स्टेम ५० सेमी लांबीची काढतो. जर्मिनेटरमुळे स्टेमची लांबी व जाडी लवकर वाढते. एरवी फुटवा ७ ते ८ दिवसात होतो. तोच जर्मिनेटची फवारणी घेतली असता ५ ते ६ दिवसात होतो. या अनुभवावरून आज (२४/०८/२०११) १० लि. जर्मिनेटर घेऊन जात आहे.