कळी निघणार नाही - सल्लागार (कन्सल्टंट), पण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कळी हमखास निघाली

श्री. राजाराम मारुती वाघमारे,
मु. पो. बाभुळगांव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर.
मोबा.९४२३५२२९९०



मी मागील ४ वर्षापुर्वी १ एकर भगवा डाळींब आणि १ एकर गणेश डाळींबाची लागवड केली होती. परंतु मला आतापर्यंत एकही बहार यशस्वी झालेला नाही. माझी डॉ.बावसकर सरांशी भेट झाल्यानंतर मी त्यांचे मार्गदर्शनानुसार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर सुरू केला. गेल्या वर्षीही मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केला होता. परंतु पाणी कमी असल्यामुळे बहार फेल गेला. त्यावेळेच मी शेणखत + डीएपी + निंबोळी पेंड व कल्पतरू खत घातले होते. परंतु पाण्याची अडचण आल्यामुळे मी तो बहार धरला नाही. त्यानंतर ४ ते ५ महिन्यांनी मी नुसते झाडांना पाणी देत राहिलो व फक्त झाडे कशी -बशी जगवली.

ह्यावेळेस योग्य नियोजनानुसार बहार धरण्याचे ठरविले त्यानुसार माझी बाग बघण्याकरिता महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ज्ञ मंडळी आले होते व त्यावेळेस मला त्यांनी एका डाळींब सल्लागाराची माहिती दिली. ती व्यक्ती एकरी १०,००० रू. फी घेवून त्यांच्या सल्ल्यानुसार डाळींबाची बाग यशस्वी करून देतात. मला त्यांचा नंबर दिला व मी त्यांना फोन केला. ते माझ्या बागेमध्ये आले, त्यावेळेस त्यांनी सांगितले की, भगवा डाळिंबाचा आपण बहार धरू या. पण गणेश डाळिंबाचा बहार धरायला नको. कारण की, त्याची छाटणी ही योग्य पद्धतीने केलेली नाही. म्हणजे ज्या फांद्यांना कळी निघायची त्याच फांद्या छाटल्या आहेत. त्यामुळे गणेश डाळींबाला कळी निघणार नाही व त्यानुसार फक्त भगवा डाळींब १ एकरसाठी १०,००० रू. की द्यायचे कबुल करून मी भगव्याचा बहार धरला. त्या व्यक्तीने सांगितलेलि सर्व खते व औषधे मी वापरायला सुरुवात केली. एके दिवशी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. शहाजी गायकवाड (मोबा. ९८५०५१५९९१ ) आले व त्यांनी सांगितले की, तुम्ही तुमच्या पद्धतीने भगव्याचा बहार धरा, पण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीनुसार गणेश डाळींबाचा बहार धरा. कळी थोडी पुढे - मागे होईल पण १०० % निघेल. त्यांनी सांगितल्यानुसार लगेच मी जर्मिनेटर ५ मिली + थ्राईवर ५ मिली / १ लि. पाण्याला प्रमाण घेऊन फवारणी केली. मागील वर्षी मी प्रत्येक झाडांना खत धातले होते व बहार धरला नसल्यामुळे मी झाडांना पुन्हा खत घातले नाही. परंतु श्री. गायकवाड यांनी १२: ६१:०० हे खत ड्रिपद्वारे (३ किलो + २०० लि. पाणी ) असे ३ - ३ दिवसांच्या अंतराने तीन वेळेस द्यायला सांगितले. त्याप्रमाणे मी खत वापरले. परत ८ ते १० दिवसाच्या अंतराने जर्मिनेटर + थ्राईवर यांची फवारणी केली असता गणेश डाळींबावरती कळी दिसू लागली.

निघणारी कळी ही लांब आणि मोठी (टपोरी) मादी कळी होती. कळी निघाल्यावरती मी थ्रिप्ससाठी किटकनाशके वापरली होती. त्यामुळे फुलमाशी जास्त नव्हती, परंतु मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रोटेक्टंट पावडर (१ किलो) २०० लि. पाणी या पद्धतीने फवारणी केली. त्यामुळे मधमाशा घोंगावू लागल्या. त्याने परागीभवन चांगले होऊन सेटिंग चालू झाले. काही वेळेस फुलगळ होत होती ती पण थांबली. त्यानंतर मी कृषी पंढरी अॅग्रो एजन्सी, पंढरपूर येथून कल्पतरू खत आणून प्रत्येक झाडांना वापरले.

गणेश डाळींबाचे फळ हे लिंबू, चिक्कू आकाराचे आहे. आता या खेपेला भगवा व गणेश या डाळींबावरती तेल्या रोग काही प्रमाणात आलेला आहे. त्याकरिता मी तेल्या ह्या रोगाकरीता बाजारात मिळणारे औषध वापरले, पण फरक काही पडला नाही. त्यामुळे फळ व पाने कडक झाली आहेत. आता मी कॅल्शियम नायट्रेट १ ग्रॅम + मॅग्नेशिअम सल्फेट १ ग्रॅम + क्रॉंपशाईनर ५ मिली + कोसावेट २ ग्रॅम यांची फवारणी करणार आहे. ह्या गणेश डाळींबाला एकरी १०,००० रू. घेणारी व्यक्ती म्हणत होती की, कळी निघणार नाही, परंतु डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी ही सरस ठरली एवढेच मला म्हणावेसे वाटते.