पहिल्याच वर्षी भगव्यापासून ३ लाख

श्री. केरूभाऊ लक्ष्मण पळसकर, मु. पो. टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे. मोबा. ९९७०७४७२२३

आम्ही मध्यम मुरमाड प्रतीच्या २॥ एकरमध्ये डिसेंबर २००९ ला १२ x ८ फुटावर ३ x ३ फूट आकाराचे खड्डे खोदून त्यामध्ये पालापाचोला, शेणखत २ पाट्या, कल्पतरू २५० ग्रॅम टाकून खड्डे भरून भगवा डाळींबाची लागवड केली. लागवडीनंतर जर्मिनेटरचे ड्रेंचिंग केल्यामुळे सर्व रोपे जगली. पुढे सरांनी सांगितल्याप्रमाणे सप्तामृताची फवारणी व कल्पतरू खताचा वापर करत राहिलो. त्यामुळे सप्टेंबर २०११ मध्ये हस्त बहार धरता आला. नारायणगाव शाखेचे श्री. दिलीप अरगडे यांच्या सल्ल्यानुसार पुढे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा तसेच किटकनाशक, बुरशीनाशक व रासायनिक खतांचा संयुक्त वापर करून पहिलाच बहार यशस्वी केला. अडीच एकरात १० टन माल ऑगस्ट २०१२ अखेरपर्यंत निघाला. त्यांची विक्री श्री. बापूशेट पिंगळे, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक आणि सिद्धरूढ फ्रुट कंपनी, गुलटेकडी, मार्केटयार्ड, पुणे यांच्याकडे केली. नाशिकला ६ टन तर पुणे मार्केटला ४ टन माल विकला. नाशिक मार्केटमध्ये ३० ते ७५ रू. तर पुणे येथे ३० ते ५५ रू. / किलो भाव मिळाला. यातून पहिल्याच वर्षी ३ लाख रुपये मिळावे.

Related New Articles
more...