'कृषी विज्ञान' शेतकऱ्यांचा खरा मार्गदर्शक !

श्री. महावीर शामगोंडा पाटील,
मु. पो. चिंचवाड, ता. करवीर, जि. कोल्हापूर


कोल्हापूरमध्ये भिमा कृषी प्रदर्शन - २०१२ मेरी वेदर ग्राउंड या ठिकाणी भरले होते. या ठिकाणी मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी (अॅग्रो) प्रा. लि. या स्टॉंलला भेट देऊन औषधांची माहिती व टोमॅटो पुस्तक घेतले. पुस्तक २ वेळा पुर्ण वाचून काढले आणि हे तंत्रज्ञान टोमॅटो पिकासाठी वापरण्याचा निश्चय केला.

सुरूवातीस नर्सरीमधून रोपे (तरू) आणून जर्मिनेटर च्या द्रावणात पुर्ण बुडवून लागवड केली. त्यामुळे रोपे सतेज, सरळ ताट झाली. मर अजिबात झाली नाही हे रिझल्ट पाहून लावणीनंतर १० दिवसांच्या अंतराने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी (अॅग्रो) प्रा. लि. च्या औषधांची फवारणी केली. त्यामुळे उंची व फुटवा भरपूर निघून पानांची रुंदी वाढली. असे १० ते १५ दिवसांच्या अंतराने प्रोटेक्टंट बरोबर फवारण्या केल्याने रासायनिक किटकनाशक वापरण्याची गरज पडली नाही. प्रोटेक्टंटची पावडर प्रत्येक वेळी वापरल्याने अळीचा प्रादुर्भाव कमी झाला. आतापर्यंतच्या अनुभवानुसार हे तंत्रज्ञान वापरून सर्वात चांगले उत्पादन घेतले आहे.