पपईवरील व्हायरसवर ४ थ्या दिवशी रिझल्ट

हाजी जलीलू भाई रहिमान,
मु. पो. नेरपिंगळी, ता. मोशी, जि. अमरावती - ४४४७०७.
मोबा- ९७६४२५०६७१


प्रथम माझ्या वाचण्यात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे पपईचे पुस्तक आले. त्यावरून आपणही पपईची लागवड करावी असे वाटले. त्यानंतर अमरावती येथे जाऊन श्री. सुधीर लढ्ढा यांची भेट झाल्यावर त्यांच्याकडून पपई संदर्भात अजून माहिती घेऊन १५००० पपईची रोपे आणून १५ जून ते ३० जून २०१२ या कालावधीत ९३ एकरमध्ये भारी काळ्या जमिनीत ५' x ५' वर पपईच्या रोपांची लागवड केली. लागवडीनंतर साधारण महिन्याचा प्लॉट असताना या पपईवर व्हायरस. मर या रोगांचा आणि मिलीबग किडीचा प्रादुर्भाव झाला. याच्या नियंत्रणासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे आणण्यासाठी अमरावतीला गेलो. तेथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. पंडीत अदाते यांची भेत झाली. त्यांनी जर्मिनेटर, थ्राईवर, न्युट्राटोन प्रत्येकी ४ मिली आणि प्रोटेक्टंट पावडर ४ ग्रॅम हार्मोनी १.५ मिली/ लि. पाणी याप्रमाणे फवारणी करण्यास सांगितले. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे सप्तामृत औषधे श्री. लढ्ढा यांचेकडून घेऊन गेलो व त्याची फवारणी केली. तर चौथ्या दिवशी रिझल्ट दिसला. पाने हिरवीगार झाली. मुळावाटे जर्मिनेटर दिल्यामुळे मर थांबून पांढऱ्या मुळ्यांचा जारवा वाढला. बाग पुर्णपणे निरोगी होऊन वाढ जोमाने झाली. ३॥ महिन्यात बागेला सध्या फुलकळी लागली आहे. रोपे लावली त्यावेळी जास्त दिवसांची २ ते २॥ फुट उंचीची झाली होती. ती लावली तेव्हा जगणार नाही असे वाटत असतानाच मर सुरू झाली. मात्र अशा अवस्थेतूनही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आम्हाला तारले. म्हणून पुढेही हेच तंत्रज्ञान वापरून दर्जेदार उत्पादन घेण्याचा आमचा मानस आहे. आता २० बॅगा कल्पतरू सेंद्रिय खत वापरत आहे.